IFFI 2021: स्पर्धा विभागाचा दर्जा घसरतोय!

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपट कधीच पहिल्या दिवशी दाखवले जात नाहीत
IFFI 2021: स्पर्धा विभागाचा दर्जा घसरतोय!
IFFI 2021: स्पर्धा विभागाचा दर्जा घसरतोय! Dainik Gomantak
Published on
Updated on

एकूण 44 इफ्फीची (IFFI) शिदोरी जवळ असली की, आपल्याला कशाला सामोरे जावे लागेल याची कल्पना आलेली असते, असे मला वाटायचे. यंदाच्या इफ्फीत (IFFI) सहभागी होण्यासाठी मी 20 रोजी गोव्यात (Goa) आलो आणि माझ्या नेहमीच्या हॉटेलांत (Hotel) गेलो तर तिथे सगळेच अस्ताव्यस्त. पण, पदरमोड करून इफ्फी (IFFI) अनुभवणाऱ्या माझ्यासारख्यांना तक्रार करता नाही येत. सामान ठेवलं आणि माझा अधिस्वकृती बॅज व शुभारंभ सोहळ्याची निमंत्रणपत्रिका आणायला धावलो. आमची बस दोन वाजता सुटेल, असे सांगण्यात आले होते. पण, सुटली तासभर उशिराने. साडेतीन वाजता उद्‍घाटन सोहळा होणार होता. आम्ही पोहोचलो 3.25 ला. जोराचा पाऊस सुरू झाला होता आणि तिथे पोहोचल्यावर सांगण्यात आले की यावर्षीपासून मीडियासाठीचे (Media) प्रवेशद्वार 360 अंशाच्या कोनात फिरवून स्टेडियमच्या (Stadium) थेट विरुद्ध दिशेला ठेवलेले आहे. मग पुन्हा धावाधाव..!

पत्र सूचना विभागाने एक पत्रकार परिषद घेऊन इंडियन पॅनोरमा (Indian Panorama) विभागातील निवड समितीची नावे जाहीर केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील नावे कुठेच गवसेनात. त्यांच्या निवडप्रक्रियेविषयी आता काही विचारणेही निरर्थकच ठरेल. मात्र कुठेतरी, काहीतरी चुकतेच खास.

शुभारंभी चित्रपटाला रांगा

शुभारंभाचा चित्रपट (Movie) पाहायला जायचे होते, पण आयनॉक्सकडे जायला काहीच व्यवस्था नव्हती. मदतीला धावून आला वाहतूक व्यवस्था पाहाणारा एक सहृदय आणि त्याने आयनॉक्सच्या कारमधून माझी रवानगी केली. पावसामुळे मी काहीसा भिजलोच होतो. आयनॉक्स गाठल्यावर मुंगीच्या गतीने पुढे सरकणाऱ्या रांगेत उभे राहाणे आले. 200 मीटर लांबीची ती रांग. भिजलेल्‍या अवस्थेत ती रांग पार करून कार्लोस सॉराचा शुभारंभाचा चित्रपट (Movie) पाहाण्यातले माझे स्वारस्य तिथेच संपले आणि मी माघारी वळलो. शुभारंभाच्या सहभोजनाचे मला निमंत्रण नव्हते. मी एका स्नेही दांपत्याच्या निमंत्रणावरून ताळगावला त्यांच्या घरी जेवणासाठी गेलो.

IFFI 2021: स्पर्धा विभागाचा दर्जा घसरतोय!
Sunburn Festival आता 'हिलटॉप वागातोर' येथे

इफ्फीचा नारळ आंबलेला निघाला

नेहमीप्रमाणे मला स्वारस्य होते ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांत. दुसऱ्या दिवशी माझे स्नेही जोडपे आणि काही मित्रमंडळी मिळून बोंडला येथे सहलीला जाणार होती. मीही त्‍यांच्‍यासोबत निघालो. म्हणजे माझे चित्रदर्शन सुरू झाले ते 21 रोजी, सायंकाळी 5.30 वाजता. ‘शार्लोटे’ हा माझ्यासाठी तरी शुभारंभाचा चित्रपट (Movie) होता. 52 व्या इफ्फीचा (IFFI) नारळ अशा प्रकारे आंबलेला निघाला.

उद्‍घाटन सोहळा लांबला

स्टेडियममध्ये आल्यावर तासभर तालिम आणि दोष निवारणाची धडपड पाहायला मिळाली. मग, सूत्रनिवेदन मंचावर पातले. एक होता करण जोहर, दुसऱ्याचे नाव मुरली की असेच काही होते. तब्‍बल 90 मिनिटे आम्हाला त्यांची पोपटपंची, लंबीचवडी भाषणे आणि ऑडिओ- व्हिज्युअल्सचा मारा सहन करावा लागला. उद्‍घाटन सोहळा लांबल्‍याने मला तेथे राहवेना. सहा वाजता मी स्टेडियममधून (Stadium) बाहेर आलो.

इफ्फीचा दिवस दुसरा

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपट कधीच पहिल्या दिवशी दाखवले जात नाहीत. सायमन फ्रान्कोने दिग्दर्शित केलेला पॅराग्वे देशाचा ‘शार्लोटे’ हा चित्रपट होता. 79 मिनिटांचा आणि मी तासाभराने थिएटर सोडले. दुसऱ्यांदा तरी मी सुदैवी ठरेन, असे म्हणत पोलंडचा ‘लिडर’ हा चित्रपट पाहायला गेलो. चित्रपट प्रदर्शनपूर्व गाजावाजा निर्देशकाने केला होता, पण तेथेही फुसकाच बार पदरी आला.

भन्नाट डोके कुणाचे?

एका दिवसात स्पर्धा विभागातले चार चित्रपट (Movie) दाखवायचे भन्नाट डोके कुणाचे असावे बरे? हा अनुभव मी 23 नोव्हेंबर रोजी घेतला. मला डॉर्म (हंगेरी) व वसंतराव (भारत) हे चित्रपट पाहाता आले. चित्रपट पहिल्याचा दार्शनिक अत्याचार सहन न होऊन मी थिएटर सोडले, तर ‘वंसतराव’ हा 180 मिनिटांचा चित्रपट (Movie) मी मधूनमधून डुलक्या घेत पाहिला. उरलेले दोन चित्रपट मला सोडून द्यावे लागले.

IFFI 2021: स्पर्धा विभागाचा दर्जा घसरतोय!
अनिल कपूर झुंजतायत गंभीर आजाराशी? जर्मनीत सुरू आहेत उपचार

स्पर्धा विभागाने केली निराशा

24 रोजी स्पर्धा विभागातले तीन चित्रपट (Movie) होते ब्राझिलचा ‘फॉलन’, फिनलंडचा ‘अॅनी डे नाव’ आणि अमेरिका- जर्मनीचा ‘लँड ऑफ ड्रिम्स’. वेळेच्या गोंधळामुळे मला पहिला चित्रपट (Movie) पाहाता आला नाही. ‘अॅनी डे नाव’ने घोर निराशा केली आणि तिसराही जेमतेमच होता. स्पर्धा विभागात असले चित्रपट (Movie) दाखवायचे? निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागणार नाही तर काय?

चित्रपट समीक्षकांचाही समावेश हवा

गेली काही वर्षे मी सातत्याने मागणी करतोय की, 40 पेक्षा अधिक इफ्फी (IFFI) पाहिलेल्या आणि वयाची साठी ओलांडलेल्या पत्रकार- समीक्षकांना महोत्सवामार्फत चित्रपट (Movie) निवडीसाठी वर्णी लावली पाहिजे. विविध समित्या आणि परीक्षक मंडळांत त्यांचा समावेश करायला हवा. तसेच ज्युरी व समिती सदस्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभही त्यांना मिळावा.

सिराज सय्यद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com