Madhu Mantena-Ira Trivedi Dainik Gomantak
मनोरंजन

Madhu Mantena Wedding: मधु मंटेनाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; इरा त्रिवेदी म्हणते- आता मी...

Madhu Mantena Wedding: याआधी त्यांनी फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत लग्नगाठ बांधली होती.

दैनिक गोमन्तक

Madhu Mantena Wedding: प्रसिद्ध फिल्म प्रोड्यूसर मधू मंटेनाने योगा टीचर आणि लेखिका असणाऱ्या इरा त्रिवेदी सोबत धूमधडाक्यात लग्न केले आहे. या लग्नात बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकार सामील झाले होते. लग्नानंतर मधू मंटेना आणि इरा त्रिवेदी यांनी शेअर केलेले फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे.

या फोटोंमध्ये मधू मंटेनाने क्रीम कलर ची शेरवानी आणि इरा त्रिवेदीने पिंक कलरची साडी नेसल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नाचे हे फोटो शेअर करताना इराने कॅप्शनमध्ये दोघांच्या नावाची I आणि M ही अद्याक्षरे लिहित आता मी पूर्ण झाले असे लिहले आहे.

  • मेंहदीच्या कार्यक्रमात बॉलीवूडचे सितारे

लग्नाच्याआधी या जोडप्याने मेंहदीचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमामध्ये बॉलीवूडचे अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री सामील झाल्याचे दिसून आले. आमिर खान ऋतिक रोशन, राजकुमार राव आपली पत्नी पत्रलेखा सोबत, अॅक्टर प्रोड्यूसर निखिल द्विवेदी शिवाय अनेक स्टार दिसून आले.

  • मधू मंटेनाचे दूसरे लग्न

मधू मेंटाना यांचे इरा त्रिवेदीसोबत हे दूसरे लग्न आहे. याआधी त्यांनी फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

महत्वाचे म्हणजे, मधू यांच्याआधी मसाबाने जानेवारीमध्ये सत्यदीप मिस्रासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे, सत्यदीपचेदेखील हे दुसरे लग्न आहे. याआधी त्याने अभिनेत्री आदिती राव हैदरीसोबत पहिले लग्न केले होते.

  • मधू मंटेनाचे प्रसिद्ध चित्रपट

मधू यांनी अनेक चित्रपट प्रोड्यूस केले आहेत. आमिर खान की 'गजनी', 'क्वीन', 'मसान' आणि 'लुटेरा' अशा प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT