Martin Scorsese 
मनोरंजन

जगप्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी येणार गोव्यात

गोव्यात होणाऱ्या या वर्षीच्या 52व्या इफ्फीत जगप्रसिद्ध सिनेमा दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी यांना ‘सत्यजित रे’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवात त्यांचे चित्रपट पडद्यावर दिसतीलच ते चुकवू नयेत.

दैनिक गोमन्तक

साधने वापरून सिनेमा बनत नाही. तो तुम्ही बनवता.’ असे मार्टिन स्कोर्सेसीने आपल्या मुलीला एका पत्रात लिहिले. आपल्या पत्रामधल्या या वाक्यातील ‘तुम्ही’वर मार्टिन स्कोर्सेसीचा अत्यंत विश्वास होता. सिनेमा बनवण्यासाठी इच्छुक असलेल्या ‘तुम्ही’ना मार्टिनला जे सांगायचे होते तेच त्याने आपल्यात जपले होते. ‘भविष्यात ज्याला आम्हीच सिनेमा म्हणून ओळखतो ते मल्टिप्लेक्सचे पडदे संकुचित होत जातील आणि अधिकाधिक छोट्या पडद्यावर, ऑनलाइन माध्यमातून आणि न जाणो कोणत्या स्थितीत आणि अवकाशात सिनेमाचे अस्तित्व तग धरून राहील, ज्याची मी आता कल्पनाही करू शकत नाही’ असेही तो पुढे म्हणतो.

सिनेमाचे भविष्य ओळखणाऱ्या मार्टिन स्कोर्सेसीने आम्हाला 1967 पासून सिनेमा दिले आहेत. गेली 54 वर्षे तो त्याच्या चित्रपटातून गुन्हे, थरार आणि त्यामागच्या मानसिकतेच्या छटांचे दर्शन घडवित, माणसांच्या अ-नायकी स्वरूपाला आमच्या समोर मांडतो आहे. 2019 साली नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘दि आयरीशमॅन’ पर्यंत तो माणसात थंडपणे वसून असलेल्या आणि संधी मिळताच जहरी नागाप्रमाणे फणा उभारून डसणाऱ्या मानवी प्रवृत्तीला आपल्या सिनेमातून सादर करत राहिला आहे. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (1976), ‘गूडफेलास’ (1990), ‘एव्हिअ‍ॅटर’ (2004), ‘शटर आयलँड’ (2010) हे त्याचे सिनेमा पाहिल्यास माणसामधले अस्वच्छ स्वच्छपणे मांडण्यास तो कचरत नाही हे स्पष्टपणे कळते.

‘हार्ट पाउंडिंग मुव्हीज’ या यादीत अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने त्याच्या दोन सिनेमांना स्थान दिले आहे ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ‘रेजिंग बुल’. 2007 साली टाइम मॅगझिनने मार्टिनला, त्या वर्षीच्या शंभर प्रभावी व्यक्तिमत्त्वात स्थान दिले होते. 2020 सालच्या ऑस्कर पारितोषिक सोहळ्यात ‘पॅरासाईट’ या सिनेमासाठी आपले उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक स्वीकारताना प्रसिद्ध दिग्दर्शक बॉन्ग जुन हो म्हणाले, ‘मी जेव्हा लहान होतो तेव्हा एक म्हण होती की ‘मी खोल माझे हृदय कोरत गेलो’. याचा अर्थ जे खूप वैयक्तिक असते ते खूप सर्जनशील असते.’ बॉन्ग जुन हो पुढे म्हणाले की हे वाक्य त्यांनी मार्टिन स्कोर्सेसीकडून ऐकले आहे. हे ऐकताच त्या हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या साऱ्यांनी उभे राहून मार्टिन स्कोर्सेसीसाठी टाळ्यांचा कडकडाट केला होता.

मार्टिन स्कोर्सेसीनि आतापर्यंत चोवीस सिनेमा दिग्दर्शित केले आहे. त्यांच्या बहुतेक साऱ्या सिनेमाना ऑस्कर, बाफ्ता किंवा गोल्डन ग्लोब नॉमिनेशन लाभले आहे. अ‍ॅवार्ड तर विक्रमी आहेत आणि सिनेमा म्हणाल तर, त्यांनी आपले हृदय खोलवर कोरूनच ते तयार केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

SCROLL FOR NEXT