Pradip Patwardhan Dainik Gomantak
मनोरंजन

Pradip Patwardhan: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

Pradip Patwardhan Dies: मराठीतले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradip Patwardhan) यांचं निधन झालं आहे

दैनिक गोमन्तक

आपल्या अभिनयानं नाट्य आणि सीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradip Patwardhan) यांचे ह्रदय विकाराने निधन झाले. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी गाजवली.

मराठी (Marathi) चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज म्हणजे 9 ऑगस्टला हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी गिरगाव येथील निवासस्थानी अखेरच्या श्वास घेतला. आपल्या आभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आदरानं नाव घेतला जाते. प्रदीप पटनवर्धन यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बऱ्याचं स्पर्धा गाजवल्या होत्या. त्यांनी अनेक चित्रपट(Movie) , नाटक (Drama) आणि मालिकामध्ये काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे प्रसिध्द चित्रपट

एक फुल चार हाफ (1991)

डान्स पार्टी (1995)

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009)

गोळा बेरीज (2012)

बॉम्बे वेल्वेट (2015)

पोलीस लाइन (2016)

नवरा माझा नवसाचा

परीस 2013

थॅक यू विठ्ठला 2017

चिरनेर 2019

* नाटकांमध्ये महत्वाची भुमिका
प्रदीप पटवर्धन यांच्या 'मोरूची मावशी' या नाटकाला प्रेक्षकांची खुप पसंती मिळाली. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT