Manisha Rani Dainik Gomantak
मनोरंजन

Manisha Rani: 'मी माझ्या बापापेक्षा...' मनिषा रानीने 'झलक दिख ला जा' ची ट्रॉफी जिंकल्यावर व्यक्त केल्या भावना

Manisha Rani: पण मनीषा राणीने शोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हा यांना मागे टाकत ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

दैनिक गोमन्तक

Manisha Rani lifted trophy jahlak dikh la jaa season11

बिग बॉस फेम मनिषा रानी नेहमीच चर्चेत असते. आता मात्र झलक दिख ला जा या रिएॅलिटी शो ची ट्रॉफी आपल्या नावावर करत मनिषा रानी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे. मनीषा राणी, शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा, श्रीराम चंद्र आणि धनश्री वर्मा यांच्यासह 5 स्पर्धकांनी महाअंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली आणि प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली. पण मनीषा राणीने शोएब इब्राहिम आणि अद्रिजा सिन्हा यांना मागे टाकत ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

शो जिंकल्यानंतर तिने हा विजय आपल्या चाहत्यांना समर्पित केला आहे. ती म्हणाली की- मी जे नेहमीच म्हणते, आजही तेच म्हणते, मला माझ्या वडीलांपेक्षा जास्त चाहत्यांवर विश्वास आहे. त्यांनीच हा विजय माझ्या नावावर केला आहे. त्यामुळे हे यश मी चाहत्यांना, प्रेक्षकांना समर्पित करते.

मनीषाचा कोरिओग्राफर आशुतोष पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तो म्हणाला की आम्ही सीझनचे विजेता आहोत यावर विश्वास बसत नाही. तो सहाय्यक नृत्यदिग्दर्शक बनून इथपर्यंत पोहोचू शकला तर ही ट्रॉफी देखील हे जिंकू शकतो. मनीषा राणीचा बिनधास्त स्वभाव आणि किलर डान्स मूव्ह्सने तिला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळे केले.

अत्यंत कमी काळात तिने अनेकांची मने जिंकली आहेत. महत्वाचे म्हणजे, तिने फक्त चाहत्यांची मन जिंकले नाही तर लायका अरोरा, फराह खान आणि अर्शद वारसी या जज म्हणून काम पाहणाऱ्या कलाकारांचे मनदेखील जिंकले आहे.

ग्रँड फिनालेमध्ये सारा अली खान, विजय वर्मा आणि हुमा कुरेशी यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. आता मनिषा रानीच्या या यशानंतर तिचे चाहते तिच्यावर प्रचंड खूष असल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

SCROLL FOR NEXT