मनोरंजन

Manike Song: 'थँक गॉड'चे 'मनिके' गाणं प्रदर्शित; नोरा, सिद्धार्थची अफलातून केमिस्ट्री

गोमन्तक डिजिटल टीम

अजय देवगण (Ajay Devgn), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) स्टारर 'थँक गॉड' (Thank God) या चित्रपटातील 'मनिके' (Manike Song) हे गाणे प्रदर्शित झाले आहे. खूप दिवसांपासून या गाण्याची चर्चा होती आणि आता हे गाणे सर्वांसमोर आले आहे. नोरा फतेह (Nora Fatehi) डान्ससाठी प्रसिद्ध आहे. नोरा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी 'मनिके' गाण्यात धिरकताना दिसत आहे. या गाण्यात दोघांची केमिस्ट्री अप्रतिम दिसत आहे.

नोरा फतेही पुन्हा एकदा 'मनिके' गाण्यात दिसणार आहे. नोरा या गाण्यात खूप बोल्ड दिसत असून, सिद्धार्थही खूपच हँडसम दिसत आहे. योहानी, जुबिन नौटियाल आणि सूर्या रगुनाथानी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. संगीत तनिष्क बागची यांचे आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच हे गाणेही खूप पसंत केले जात आहे.

नोरा फतेहने याआधीही अनेक चित्रपटांमध्ये आयटम नंबर केले आहेत आणि ती गाणी प्रेक्षकांना खूप आवडली आहेत. नोराचा ग्लॅमरस लूक आणि तिच्या डान्सची देशातच नाही तर परदेशातही चर्चा आहे. या गाण्यानंतर नोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चित्रपटातील नोराचे हे गाणे पाहण्यासाठी चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT