Malayalam Actress Lakshmika Sajeevan: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले. या बातमीने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. साऊथ इंडस्ट्रीतील तरुण अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन तिच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखली जात होती. लक्ष्मीकाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र आता, लक्ष्मीकाच्या निधनाच्या वृत्तामुळे मल्याळम इंडस्ट्रीत शोकाचे वातावरण आहे.
दरम्यान, लक्ष्मीका सजीवन हिचे शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह इथे निधन झाले. लक्ष्मीकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ती शारजाहमधील एका बँकेत काही कामासाठी गेली होती, असे सांगण्यात येत आहे. लक्ष्मीका सजीवनला मल्याळम शॉर्ट फिल्म 'कक्का' मधून खूप प्रसिद्ध मिळाली, ज्यामध्ये तिने पंचमीची मुख्य भूमिका साकारुन सर्वांची मने जिंकली होती. या शॉर्ट फिल्ममधील तिच्या कामाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. लक्ष्मीका सजीवनच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, तिने सूर्यास्ताचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत.
दुसरीकडे, 'कक्का' या लाइव्ह अॅक्शन चित्रपटात गरीब मुलीची भूमिका लक्ष्मीकाने साकारली होती. 'कक्का'चे दिग्दर्शन अजू अजेश यांनी केले होते. या चित्रपटात लक्ष्मीका सजीवन व्यतिरिक्त गंगा सुरेंद्रन, सतीश अंबाडी, श्रीला नलेदम आणि विपिन नील यांचाही समावेश होता. OTT वर या चित्रपटाला 6 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'कक्का' हा चित्रपट 14 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित झाला होता.
लक्ष्मीका सजीवनने 'पुझायम्मा', 'पंचवर्नाथथा', 'सऊदी वेल्लक्का', 'उयारे', 'ओरु कुट्टनाडन ब्लॉग', 'ओरु यमंदन प्रेमकथा' आणि 'नित्यहरिथा नायगन' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. प्रशांत बी मोल्लिकल दिग्दर्शित 'कून' या चित्रपटात लक्ष्मीका शेवटची दिसली होती. 'पुझायम्मा' चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेसाठी तिला लोकांकडून खूप प्रशंसा मिळाली होती. हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला होता आणि विजेश मणी यांनी दिग्दर्शित केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.