Jawan Box Office: ...अन् शाहरुखने पहिला नंबर पटकावला; 39 व्या दिवशीदेखील 'जवान'ने कमावले कोटी

Jawan Box Office: 7 सप्टेंबरला शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, पण त्यापैकी कोणाचा या चित्रपटावर काही परिणाम झाला नाही.
Shahrukh Khan's Jawan
Shahrukh Khan's JawanDainik Gomantak
Published on
Updated on

Jawan Box Office Collection: गेल्या तीन दिवसांपासून शाहरुख खान आणि विजय सेतुपती यांच्या 'जवान' चित्रपटाच्या कमाईत बंपर जंप आहे.

रविवारी या चित्रपटाने एवढी मोठी कमाई केली की 39व्या दिवशी बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम या चित्रपटाने आपल्या नावावर केला आहे.

मात्र, या बाबतीत 'जवान'ने यावर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'जवान'ने दमदार कमाई करत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे.

7 सप्टेंबरला शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉलिवूडचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, पण त्यापैकी कोणाचा या चित्रपटावर काही परिणाम झाला नाही.

'जवानने पहिल्याच दिवशी 75 कोटींचा विक्रम करून आपण मोठ्या शर्यतीत असणार असल्याचे दाखवून दिले.

मिळालेल्या माहीतीनुसार, चित्रपटाने शुक्रवारी 4.79 कोटींची कमाई केली आणि रविवारीही उत्कृष्ट व्यवसाय केला.

या चित्रपटाने सहाव्या रविवारी म्हणजेच 39 व्या दिवशी जवळपास 2.11 कोटींची कमाई केली आहे. यासह, चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण 635.84 कोटींची कमाई केली आहे.

Shahrukh Khan's Jawan
Bigg Boss 17: बिग बॉसच्या 17 व्या सीझनला राड्याने सुरुवात

'जवान'ची जगभरातील कमाई

'जवान'च्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 1,136.01 कोटींची कमाई केली आहे.

रेड चिलीज निर्मित 'जवान' या चित्रपटा( Movie )त शाहरुख खान व्यतिरिक्त विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर असे अनेक स्टार्स आहेत. या चित्रपटात शाहरुख खान( Shahrukh Khan ) दुहेरी भूमिकेत दिसत आहे.

'जवान' तीन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. ज्यामध्ये हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलगूचाही समावेश आहे. 39व्या दिवशी बॉलिवूडच्या मोठी कमाई करणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर 'जवान' (2.11 कोटी) पहिल्या स्थानावर, 'पठाण' (2.05 कोटी) दुसऱ्या स्थानावर, 'बधाई हो' (1.55 कोटी) तिसऱ्या स्थानावर आहे. 'उरी: द 'सर्जिकल स्ट्राइक' (1.32 कोटी) चौथ्या स्थानावर आहे आणि 'KGF चॅप्टर 2' (रु. 83 लाख) हिंदीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com