Actor C V Dev Death Dainik Gomantak
मनोरंजन

Actor C V Dev Death: दाक्षिणात्य अभिनेते CV देव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहली श्रद्धांजली

मल्याळम अभिनेता सी व्ही देव यांचे निधन झाले आहे. त्याच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

Puja Bonkile

Actor C V Dev Death: दाक्षिणात्य अभिनेते CV देव यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे.  निधनाच्या बातमीमुळे सर्व चाहत्यांध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर लोक अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. अभिनेता सीव्ही देव यांनी 100 हून अधिक चित्रपट आणि अनेक नाटकांमध्ये काम केले होते. त्यांच्या जाण्याने मल्याळम इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

अभिनेता सीव्ही देव यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार आजारी होते. नुकतीच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 'साध्याम', 'ई पुझायुम कदन्नू', 'मिझी रांडीलम', 'चंद्रोलसवम' या चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारले असून प्रसिद्ध झाले आहेत.

  • अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीव्ही देव हृदयविकाराशी झुंज देत होते. त्याच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या अभिनेत्याचा जन्म 1940 मध्ये चमारथूर येथे झाला. 1959 मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या अनेक दशकांपासून ते इंडस्ट्रीत सक्रिय होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

Margao Dindi Utsav: 'पंढरपूरला पोर्तुगीज जायला देत नाही तर प्रत्‍यक्ष पंढरपूरच मडगावी आणायचं’, आनंद पर्वणी दिंडी महाेत्‍सव

SCROLL FOR NEXT