Actress Malaika Arora Dainik Gomantak
मनोरंजन

मलायकाने हटके अंदाजात अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा!

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. इशाकजादे (Ishaqzaade) या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुनला सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी (Celebrities) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता अर्जुनसाठी त्याची खास व्यक्ती म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora) हिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केले आहे.मलायकाने अर्जुनसोबत खूप छान फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती अर्जुनला मिठी मारताना दिसत आहे. फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले आहे - हॅपी बर्थडे सनशाईन. हार्ट इमोजी देखील पोस्ट केले.मलायकाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केले आहे. अर्जुनची चुलत बहीण रिया कपूर आणि सोनम कपूर (Sonam Kapoor)यांनी हार्ट इमोजी पोस्ट केले आहे. त्याचबरोबर दोघांचे चाहते अर्जुनला वाढदिवसाबद्दल अभिनंदन करत आहेत. काही मिनिटांत लाखो लोकांना हे पोस्ट आवडले आहे.(Malaika Arora wished her love Arjun Kapoor on his birthday in a special way)

शुक्रवारी रात्री उशीरा अर्जुन कपूरचा वडदिवास साजरा करणात आला. या वाढदिवसामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत आला असताना रणवीर सिंग (Ranveer Singh) एका विचित्र स्टाइल मध्ये दिसला. तसेच विजय देवेराकोंडा, खुशी कपूर, जान्हवी कपूर हे देखील पार्टीला पोहचले. अनुष्का शर्मा, आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंह, दिया मिर्झा, कतरिना कैफ यांच्यासह अनेक कलाकारांनी अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या आहेत.

अर्जुन कपूर अखेर सरदार का ग्रैंडसन या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अर्जुनबरोबर रकुल प्रीत सिंह, नीना गुप्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. यंदा अर्जुनचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दुसरे म्हणजे 'संदीप और पिंकी फरार है' ज्यात परिणीती चोप्रा अर्जुनसोबत दिसली होती. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला पण काही खास दाखवता आला नाही.अर्जुन लवकरच सैफ अली खान, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिजसोबत भूत पोलिस (Bhoot Police) या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो दिशा पाटनी आणि जॉन अब्राहमसोबत व्हिलन 2 (Ek Villain 2) मध्ये देखील दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

SCROLL FOR NEXT