कंगनाने स्वता:ची तुलना किशोर कुमारांशी करत म्हणते...

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनावत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.
Actress Kangana Ranaut
Actress Kangana Ranaut canva

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनावत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती प्रत्येक विषयावर मुक्तपणे आपले मत व्यक्त करते. ज्यामुळे ती सतत चर्चेत राहिली आहे. तिच्या चित्रपटापेक्षा कंगना तिच्या वक्तव्याविषयीच्या वादाचा एक भाग राहिली आहे. अलीकडेच कंगनाने आपला पासपोर्ट नूतनीकरण करण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यानंतर कंगनाने स्वत: ची तुलना गायक (Singer) किशोर कुमारशी (Kishore Kumar) केली आहे.कंगनाने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) स्टोरीवर एका ट्विटचा (Twitter) स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्या ट्विटमध्ये असे लिहिलेले आहे- आणीबाणीच्या वेळी गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांवर ऑल इंडिया रेडिओ (All India Radio)आणि दूरदर्शनवर बंदी घालण्यात आली होती कारण त्यांनी कॉंग्रेससाठी गाण्यास नकार दिला होता. किशोर कुमारबद्दल कॉंग्रेस पक्षाच्या पाठिंब्यात मला अजूनही राग दिसत आहे.(Kangana Ranaut compared herself to singer Kishore Kumar said true art always has to fight)

हा स्क्रीनशॉट पोस्ट करताना कंगनाने लिहिले की- मला आदल्या दिवशीसुद्धा माझा पासपोर्ट देण्यात आला नाही कारण कोर्ट मला परवानगी देण्यात व्यस्त आहे. होय, त्यांनी मला तेच सांगितले, परंतु जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला आढळते की खऱ्या कलेसाठी नेहमीच फॅसिझमविरूद्ध (Fascism) कठोर लढावे लागते.कंगना रनावतला तिच्या आगामी 'धकड' (Dhaakad) चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुडापेस्टला जावे लागणार आहे, त्यासाठी तिला पासपोर्ट नूतनीकरण करावे लागणार आहे, परंतु अभिनेत्रीवर देशद्रोहाचा खटला सुरू आहे, ज्यामुळे तिचा पासपोर्ट नूतनीकरण होत नाही. यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता कोर्टाने पुढील आठवड्यात याप्रकरणी सुनावणी करण्यास सांगितले आहे.

Actress Kangana Ranaut
'केलेल्या चुका मान्य करण्यासाठी हिम्मत पाहिजे'

कंगनाच्या पासपोर्टचे नूतनीकरण न झाल्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. चित्रपटाच्या निर्मात्याच्या वकिलाने असे म्हटले आहे की त्याच्या क्लायंटला रोज 15 लाख रुपयांचे नुकसान होत आहे, यामुळे प्रकरण लवकर निकाली काढायला हवे. वर्कफ्रंटबद्दल बोललो तर कंगना रनवतचा ‘थलाइवी’ (Thalaivi) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. हा चित्रपट 23 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता पण कोरोना साथीच्या आजारामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. आता चाहते या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com