Malaika Arora  Instagram
मनोरंजन

मलायका अरोराने कार अपघातानंतर शेअर केली पहिली भावनिक पोस्ट

मलायका अरोराने पहिल्यांदाच सोशल मिडियावर झालेल्या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) गाडीचा 2 एप्रिल रोजी अपघात झाला होता. ज्यात ती जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातून घरी पोहोचल्यावर अनेक कलाकारांनी मलायका अरोराच्या तब्येतीची विचारपूस केली होती. यामध्ये करीना कपूरपासून ते अर्जुन कपूरपर्यंतच्या कलाकारांचा समावेश होता. तिने काही तासांपूर्वीच पहिल्यांदाच तिच्या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे.

मलायकाने इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर फोटो शेअर करत लिहिले आहे की, "गेले काही दिवस आणि काही घटना खूप अविश्वसनीय होत्या. या गोष्टींबद्दल विचार केल्यास असे वाटते की हा अपघात एका चित्रपटातील सीन्सप्रमाणे होता. ज्या लोकांनी कठीण काळात मदत केली त्यांचे मी आभार मानते."मलायकाच्या (Malaika Arora) या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

* बॉलीवुड कलाकरांची कमेंट

ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) मलायकाच्या पोस्टवर लिहिले- 'लवकर बरे व्हा.' करिश्मा कपूरने हार्ट आणि स्मायलीचा इमोजी बनवला आहे. करीना कपूरने स्ट्राँगचे इमोजी पोस्ट केले. त्याच्याशिवाय गौहर खान, सोफी चौधरी आणि संजय कपूर यांच्यासह इतर कलाकारांनी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Goa Hotel Inspection: हडफडेच्या आगीचा धसका! दक्षिण गोव्यातील 15 हॉटेल्स-पब्जकडे NOC चं नाही, तपासणीत मोठा खुलासा

Goa Rent-a-Car: 'निर्णय मागे घ्या' नाहीतर...! रेन्ट अ कार व्यावसायिकांची पणजीत धडक; वाहतूक खात्याचा परवाना निर्णयाविरुद्ध संताप

Goa TET 2025: शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत 'विवाहबाह्य संबंधांवर' उतारा, परीक्षार्थी संतप्त; समाज माध्यमांवर उठली टीकेची झोड

Goa Drug Bust: गोवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 1 कोटींच्या अंमली पदार्थासह बेलारुसच्या महिलेला अटक; तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Illegal Nightclubs Goa: गोव्यातील नाईट क्लब, डान्सबार अन् डिस्कोथेक बेकायदेशीर, राज्याच्या कायद्यात तरतूदच नाही; बड्या अधिकाऱ्याच्या खुलाशाने खळबळ

SCROLL FOR NEXT