Malaika Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Malaika Viral Video : शेवटी तीही आईच, मुलाला निरोप देताना मलायका झाली भावुक...

अभिनेत्री मलाईका अरोरा सध्या सोशल मिडीयावर एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे, मुलगी अरहानला निरोप देताना ती भावुक झाली, हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री मलाईका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरशी झालेल्या ब्रेकअपच्या अफवेमुळे प्रचंड चर्चेत होती. पण सध्या मलाईका तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

मुलगा अरहानला निरोप देताना विमानतळावर भावुक झालेल्या मलाईकाची या व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे.

मलायका आणि अरहान

मलायका तिचा मुलगा अरहानला विमानतळावर सोडण्यासाठी आली होती. साहजिकच मुलाला निरोप देताना मलायका भावुक झाली.

या भावुक प्रसंगाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत मलायकाने अभिनयापेक्षा काही सुपरहिट डान्स नंबर्स देऊन एक सुपरहिट डान्सर असा टॅग मिळवला.

'क्लब एमटीव्ही', 'एमटीव्ही लव्ह लाइन', 'एमटीव्ही स्टाइल चेक', 'एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर', 'इंडियाज बेस्ट डान्सर' यांसारख्या अनेक शोमध्ये दिसून मलायकाने आपल्या करिअरची सुरुवात केली.

अरहानचं फिल्ममेकींगचं शिक्षण

यापूर्वीही अरहान विमानतळावर स्पॉट झाला होता तेव्हा त्याच्यासोबत जेव्हाही अरहान त्याच्यासोबत कॉलेजसाठी परदेशात गेला होता तेव्हा आई आणि वडील दोघेही सोबत होते. अरहान अमेरिकेत सिनेमाचे शिक्षण घेत आहे. मात्र, त्याचा चित्रपटात प्रवेश करण्याचा विचार आहे की नाही याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही.

निघताना अरहान त्याच्या आईला मिठी मारतो आणि मलायका यावेळी खूप भावूक होताना दिसत आहे. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

मलायकाचं अरबाज खानशी लग्न आणि डिव्होर्स

काही काळ रिलेशनशिपनंतर मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानसोबत लग्न केले आणि 2017 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

2017 साली अरबाजपासुन वेगळे झाल्यापासून मलायका अर्जुन कपूरला डेट करत असल्यामुळे खूप चर्चेत आहे. मात्र, अलीकडेच त्यांच्या विभक्त होण्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या.

अर्जुनशी ब्रेकअपच्या चर्चा

काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनच्या ब्रेक अपच्या अफवांना उधाण आलं होतं, सुरूवातीला मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी ब्रेकअपच्या अफवांवर प्रतिक्रिया दिलेली नव्हती..

खरं तर, अर्जुनसोबत कुशाचा एक फोटो समोर आला होता, ज्यानंतर लोक म्हणू लागले की दोघेही डेट करत आहेत आणि अभिनेत्याने मलायकासोबत ब्रेकअप केले आहे. मात्र कुशाने अशा अफवांवर नाराजी व्यक्त करत यात काहीही तथ्य नाही असं म्हटलंय.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT