Mahima Chaudhry Dainik Gomantak
मनोरंजन

Mahima Chaudhry on Kapil Sharma: "कपिलमुळे मी कॅन्सरशी लढू शकले! " अभिनेत्री महिमा चौधरीने सांगितली ती आठवण

अभिनेत्री महिमा चौधरीने आपल्या संघर्षातल्या काळात कपिलच्या शो ने आपली कशी मदत केली ते सांगितले आहे.

Rahul sadolikar

Mahima Chaudhry on Kapil Sharma: कपिल शर्माच्या कॉमेडीचे सगळ्याच स्तरातून कौतुक होत असते, त्याच्या कॉमेडीच्या टायमिंगने सगळ्यांनाच आजवर हसवले आहे. असाच एक किस्सा आता त्याच्या शो मध्ये ऐकायला मिळाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला आणि महिमा चौधरी या दोघी 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचल्या. येथे कपिलने या दोघांसोबत खूप धमाल केली.

बोललो यादरम्यान महिला चौधरीने तिच्या फिल्मी करिअरबद्दल सांगितले आणि कॅन्सरशी झुंज देत असताना हा शो कशी पाहायची हे सांगितले.

महिमा चौधरी हिला 2022 साली कॅन्सर झाल्याचा खुलासा गेल्या वर्षी झाला होता हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर ती अनुपम खेर यांच्यासोबत एका चित्रपटासाठी शूटिंग करत होती. आता ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचली आहे. 

त्यांच्यासोबत मनीषा कोईरालाही दिसली, मनिषानेही कॅन्सरवर मात केली आहे. त्यानिमित्ताने या दोन्ही अभिनेत्रींशी कपिलने गप्पा मारल्या. मजा मस्ती आणि विनोदांसोबतच या दोन अभिनेत्रींनी अनेक किस्सेही शेअर केले आहेत

मनीषा कोईराला 2017 मध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. त्यानंतर ती थेट 2023 मध्ये शाे मध्ये आली कपिलने यावर संवाद साधला तेव्हा मनिषाला कारण विचारले.

कपिल म्हणाला कदाचित तुम्ही पॉलिटिकल पार्टीशी संंबंधित असल्यामुळे 5 वर्षांनी आला आहात.  

 यासोबतच महिमा चौधरी तिच्या कॅन्सरच्या समस्येबद्दलही बोलते. ती म्हणते की कपिलच्या शोमुळे तिला बरे होण्यात खूप मदत झाली आहे.

महिमा म्हणाली- कपिल तू माझ्या चांगल्या आरोग्याचे कारण आहेस. अलीकडेच मला कर्करोगाचे निदान झाले आणि त्यानंतर मला फक्त कॉमेडी बघायची होती. आणि मग मी आनंदी राहावे म्हणून तुझ्या शोचा आधार घेतला. 

आणि हा आनंद तुझा शो पाहिल्यावरच मिळत होता. मला कधी झोप लागली आणि मी या आजारातून कधी बरा झालो ते मला कळलेच नाही.

महिमा चौधरीसोबत मनीषा कोईराला यांनीही कर्करोगाशी लढा दिला आहे. त्याच्यावर दीर्घ उपचार झाले. 

महिमा आणि मनीषा कोईराला यांनी सुभाष घई दिग्दर्शित चित्रपटातून पदार्पण केले. यावेळी महिमाचे नाव रितू चौधरी होते पण नंतर तिचे नाव बदलून महिमा ठेवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

चौकार-षटकारांचा पाऊस, 'पॉवर हिटर' किरण नवगिरेनं रचला इतिहास; टी-20 मध्ये झळकावलं सर्वात जलद शतक

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT