Mahesh Bhatt- Pooja Bhatta Dainik Gomantak
मनोरंजन

Mahesh Bhatt Emotional In Bigg Boss OTT: एक काळ असाही होता म्हणत महेश भट्ट झाले भावूक

Mahesh Bhatt: आता हा शो शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

Mahesh Bhatt: बिग बॉस ओटीटी शो नेहमीच कोणत्यातरी कारणाने चर्चेत असतो. मात्र आता या शोच्या निमित्ताने महेश भट्ट यांची चर्चा रंगली आहे. सध्या फॅमिली वीक सुरु असून स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी शोमध्ये येत असल्याचे दिसून येत आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्टदेखील आपल्या मुलीला पूजा भट्टला भेटण्यासाठी शो मध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी घर जेव्हा कठीण काळाचा सामना करत होते तेव्हा आपल्या मुलीने पूजाने घराला सांभाळल्याची आठवण सांगतिली आहे.

महेश भट्ट ही आठवण सांगताना भावूक झाल्याचे दिसून आले. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा महेश भट्ट यांचे चित्रपट आपला प्रभाव निर्माण करण्यामध्ये अयशस्वी ठरत होते. बॉक्स ऑफीसवर चित्रपट चालत नसल्याने म्हणावी अशी कमाई होत नव्हती.

एक काळ असाही आला त्यावेळी त्यांना 1500 रुपयांमध्येदेखील घर चालवणे भाग झाले होते. त्यावेळी पूजा भट्ट यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. कित्येक जाहीराती( Advertisement )देखील केल्या. माझ्या कठीण काळात पूजाने केलेल्या मॉडेलिंगमुळे घर चालवणे सोपे झाल्याची आठवण महेश भट्ट यांनी सांगितली आहे.

पुढे ते म्हणतात, 'मी 20 वर्षाचा असताना माझे लग्न झाले. 23 वर्षाचा असताना पूजाचा जन्म झाला. जेव्हा मी तिला पहिल्यांदा हातात घेतले होते तेव्हा पूजा माझ्यावर नाराज असून रागाने बघत असल्यासारखे वाटले होते. मात्र मला हे देखील माहीत होते की, पूजाच्या जन्मानंतर अनेक चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडणार आहेत.'

दरम्यान, महेश भट्ट यांनी पूजा भट्ट यांच्यासोबतच इतर स्पर्धकांचीदेखील भेट घेत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. मनीषा रानी पासून ते अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांचे कौतुक केले आहे. 'जेव्हा तू रडलास तेव्हा खूप वाईट वाटले' असे त्यांनी एल्विशला बोलताना म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगत स्पर्धकांना मोलाचा सल्लादेखील दिला आहे.

कधी या शोमध्ये मोठमोठी भांडणे होतात, कधी प्रेम दिसते तर कधी स्पर्धक भावूक झालेले दिसतात. आता हा शो शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यावर्षी बिग बॉस ओटीटीचा यावर्षीचा विजेता कोण असणार 12-13 ऑगस्टला समजणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trigrahi Yoga 2026: सूर्य, मंगळ आणि बुधाचा 'त्रैग्रही योग'; 'या' 5 राशींना मिळणार अमाप संपत्ती आणि प्रगतीची सुवर्णसंधी!

'मोसाद'शी संबंधित हेराला इराणमध्ये फाशी, हिंसाचाराचा ठेवला ठपका; जागतिक स्तरावर संतापाची लाट, पण तेहरान ठाम!

विमान उडाले, पण मुले खालीच राहिली! विसरभोळेपणाचा कळस आणि मातेचा टाहो; तुमची स्मरणशक्ती तुम्हाला दगा तर देत नाही ना?

Sreesanth: "भज्जीनं थप्पड कांड विकलं!" श्रीसंतचा हरभजन सिंहवर कोट्यवधींच्या कमाईचा आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

SCROLL FOR NEXT