Mahesh Babu  Dainik Gomantak
मनोरंजन

Mahesh Babu-Venkatesh: साऊथचे दोन सुपरस्टार पत्ते खेळण्यात व्यस्त; चाहते म्हणाले...

दैनिक गोमन्तक

Mahesh Babu- Venkatesh: साऊथ सुपरस्टार महेश बाबू सध्या त्याच्या 'गुंटुर करम' आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता मात्र त्याचे पत्ते खेळतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. फक्त महेशबाबूच नाही व्यंकटेश देखील पत्ते खेळताना दिसत आहे.

दोघेही पत्ते खेळताना चांगल्या मूडमध्ये दिसत होते आणि जणू ते पोकर खेळत असल्याचा भास होत होता. त्याच्या समोरच्या टेबलावर पत्त्यांसह काही नोटा होत्या.

एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या क्लब हाऊसचा हा उद्घाटन सोहळा होता असे सांगण्यात येत आहे. कामाच्या आघाडीवर, महेश बाबू त्रिविक्रम दिग्दर्शित त्याच्या पुढील रिलीज 'गुंटूर करम' साठी तयारी करत आहेत आणि हा चित्रपट 2024 च्या संक्रांतीमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी नुकताच 'दम' चित्रपटाचा प्रोमो रिलीज केला आहे.

'गुंटूर करम' चित्रपट

दोघांचे हे फोटो पाहून काही लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली, तर दुसरीकडे त्यांचे चाहते त्यांना सपोर्ट करताना दिसले. महेश बाबूच्या चित्रपटातील गाणे आधीच धुमाकूळ घालत आहे. अथाडू आणि खलिजा या चित्रपटानंतर 'गुंटूर करम' हा महेश बाबू आणि त्रिविक्रम यांचा तिसरा एकत्र चित्रपट आहे. या चित्रपटात श्रीलीला आणि मीनाक्षी चौधरी यांच्याही भूमिका आहेत.

व्यंकटेश दग्गुबती

दरम्यान, वेंकटेश दग्गुबती पुढील काळात शैलेश कोलानु दिग्दर्शित 'सैंधाव' मध्ये दिसणार आहे आणि हा चित्रपट 2024 च्या संक्रांती निमित्त बॉक्स ऑफिसवर महेश बाबूच्या 'गुंटू करम' सोबत टक्कर देणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Today's News Live: डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग लावल्याप्रकरणी एकास अटक

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

एक देश, एक निवडणूक! पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ऐतिहासिक म्हणत केले निर्णयाचे स्वागत

Goa Monsoon: अति पावसामुळे सांगेत सुपारी उत्पादकांना फटका! अजूनही गळती सुरुच; शेतकऱ्यांत चिंता

SCROLL FOR NEXT