Kartik Aaryan Dainik Go0mantak
मनोरंजन

Kartik Aaryan Upcoming Film: लव्हरबॉय कार्तिक प्रथमच 'या' भुमिकेत; शरीरयष्टीसाठी जिममध्ये गाळतोय घाम

दिग्दर्शक कबीर खानच्या चित्रपटात मिळाली संधी

Akshay Nirmale

Kartik Aaryan Upcoming Film: अभिनेता कार्तिक आर्यन ने आत्तापर्यंत लव्हर बॉय, पत्रकार, भुत उतरणारा मांत्रिक अशा भुमिका साकारल्या आहेत. आगामी चित्रपटात तो एका बॉक्सरच्या भुमिकेत दिसणार आहे. त्यासाठी त्याला शरीर कमवावे लागणार असून कार्तिक त्याच्या तयारीलाही लागला आहे.

कार्तिकचा हा आगामी चित्रपट दिग्दर्शक कबीर खान हे दिग्दर्शित करत आहेत. कबीर खान हे बॉलीवुडमधील स्वतःचे वेगळी ओळख जपलेले दिग्दर्शक आहेत. एक था टायगर, बजरंगी भाईजान, 83 या चित्रपटातून त्यांनी स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यांनी पुढील चित्रपटासाठी कार्तिकला कास्ट केल्याने कार्तिकही आनंदात आहे. त्यामुळेच कार्तिर्कने भुमिकेची गरज म्हणून लागलीच जिममध्ये वर्कआऊटला सुरवात केली आहे.

कार्तिक या भुमिकेसाठी सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर राहुल भट्ट याच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. राजकोट येथे कार्तिकने जिममध्ये राहुलच्या मार्गदर्शनाखाली तयारीला सुरवात केली आहे. कबीर खानचा हा चित्रपट एक बायोपिक असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, याबाबत जास्त माहिती समोर आलेली नाही.

साजिद नाडियादवाला या चित्रपटाचे निर्माते असून कार्तिक आणि कबीर यांनी सोशल मीडियातून या चित्रपटाबाबतची माहिती शेअर केली आहे. दरम्यान, कार्तिककडे सध्या चित्रपटांची रांग लागलेली आहे. आगामी काळात तो फ्रेडी, हेराफेरी ३, कॅप्टन इंडिया, शहजादा, सत्यप्रेम की कथा, आशिकी 3 या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT