Hritik Roshan Saba Azad New Home: हृतिकने गर्लफ्रेंडसाठी घेतला 100 कोटींचा बंगला

38 हजार चौरस फूट क्षेत्र; या घरातून दिसतो अरबी समुद्राचा सुंदर नजारा
Hritik Roshan Saba Azad New Home
Hritik Roshan Saba Azad New HomeDainik Gomantak

Hritik Roshan Saba Azad New Home: बॉलीवुडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी आता रिलेशनशिपच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. हे दोघेही आता एकाच घरात शिफ्ट होत आहेत. त्यासाठी मुंबईत हृतिकने एका अपार्टमेंटमध्ये दोन लग्झरीयस ड्युप्लेक्स खरेदी केले आहेत. या घरांची किंमत 100 रूपये असल्याचे सांगितले जात आहे.

Hritik Roshan Saba Azad New Home
Vicky Kaushal With Bear Grylls: विकीचे 'कौशल्य' लागणार पणाला, बेअर ग्रिल्ससोबत करतोय धोकादायक स्टंट

सध्या या घराचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. हृतिक आणि सबा लवकरच या नव्या घरात शिफ्ट होणार आहेत. पुर्वाश्रमीची पत्नी सुझेन खान हिच्यापासून 2014 मध्ये विभक्त झाल्यापासून हृतिक रोशन सबासोबत बऱ्याचदा दिसून आला आहे. दोघांनीही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या गुणांचे कौतूक केले होते. आता दोघेही एकाच घरात राहायला जाणार आहेत. हृतिकने जुहू-वर्सोवा लिंक रोडजवळ दोन अपार्टिमेंट खरेदी केले आहेत. या दोन्ही अपार्टमेंट्सची किंमत 97.50 कोटी रूपये आहे.

हृतिक आणि सबाच्या घरातून अरबी समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. हे घर 38 हजार चौरस फुट क्षेत्रफळात बांधले आहे. या अपार्टमेंटच्या 15 व्या आणि 16 व्या मजल्यावर हृतिकने हे दोन ड्युप्लेक्स खरेदी केले आहेत. यातील एका घराची किंमत 67.50 कोटी रूपये आहे. तर दुसऱ्या घराची किंमत 30 रूपये आहे. दोन्ही घरांचे पुर्ण नुतनीकरण झाल्यावर हे कपल या घरात राहायला जाणार आहे.

Hritik Roshan Saba Azad New Home
President Droupadi Murmu: 79 देश आणि 280 चित्रपट,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा इफ्फीसाठी खास संदेश

सबा आणि हृतिक हे बिनधास्त हातात हात घालून जाताना अनेकदा नजरेस पडले आहेत. सबा ही सुझेन खान हिचीही चांगली मैत्रिण आहे. शिवाय हृतिकच्या मुलांशीही तिची चांगली मैत्री असल्याचे सांगितले जाते. अलीकडच्या काळात सुझेन खान देखील अर्सलान गोनी याला डेट करत आहे.

दरम्यान, हृतिक सध्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' या चित्रपटाची तयारी करत आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोन आहे. तर सबानेही नुकतेच तिच्या 'सॉन्ग ऑफ पॅराडाइज' चित्रपटाचे शुटिंग पुर्ण केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com