Nausheen Shah on Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

'तुझ्या एक्स बॉयफ्रेंडवर लक्ष दे, आमच्या देशावर नको' पाकिस्तानी अभिनेत्री कंगनावर भडकली

अभिनेत्री कंगना रणौतचा आता थेट सीमापार असणाऱ्या अभिनेत्रीशी संघर्ष सुरू आहे.

Rahul sadolikar

Pakistani Actress Naushin on Kangna : आपल्या स्पष्ट वाणीने अनेकदा वाद ओढावून घेणारी बॉलीवूडची कॉन्ट्रवर्सी क्वीन कंगना रणौत एक उत्तम अभिनेत्री आहेच ;पण वादाच्या ठिकाणी कंगना असतेच असते. आता नुकतीच कंगना एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

कंगनाने पाकिस्तानवर केलेल्या वक्तव्यावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीने कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. संधी मिळाली तर कंगनाच्या कानशिलात वाजवणार असल्याचेही या अभिनेत्रीने सांगितले आहे.

कंगनाच्या कानशिलात द्यायला आवडेल !

पाकिस्तानी अभिनेत्री नौशीन शाहने कंगना रणौतला पाकिस्तानवर केलेल्या टीकेनंतर फटकारले आहे. 'हद कर दी विथ मोमीन साकिब' या चॅट शोमध्ये नौशीनने सांगितले की, तिला कंगनाला भेटून तिच्या कानशिलात लगावायला आवडेल. 

त्यानंतर नौशीन पुढे म्हणाली की कंगनाला इतर लोकांबद्दल आदर नाही आणि तिने तिच्या कामावर, तिच्या विवादांवर आणि तिच्या माजी प्रियकरांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

कंगनाला कानशिलात द्यायची आहे

'हद कर दी विथ मोमीन साकिब' या शोमध्ये नौशीन शाहला बॉलीवूडमध्ये अशी कोणती अभिनेत्री आहे का, जिला भेटायला आवडेल असे विचारले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने कंगना राणौतचे नाव घेत तिला कानशिलात द्यायची असल्याचे सांगितले. 

एक्स बॉयफ्रेंडवर लक्ष दे

अभिनेत्री नौशीन म्हणाली, 'ती ज्या प्रकारे माझ्या देशाबद्दल बकवास बोलते, ज्याप्रकारे ती पाकिस्तानी लष्कराबद्दल फालतू बडबड करते, मी तिच्या धैर्याला सलाम करते. 

तिला काही ज्ञान नाही पण ती दुसऱ्या देशाबद्दल बोलते ;पण कंगनाने पाकिस्तानवर बोलण्यापेक्षा तिच्या देशावर, तिच्या कामावर आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंड्सवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

कंगनाच्या वक्तव्याचा समाचार

नौशीन कंगनाच्या वक्तव्याबद्दल पुढे म्हणाली, 'पाकिस्तानमध्ये लोकांशी गैरवर्तन केले जाते हे तुम्हाला कसे कळते? तुम्हाला पाकिस्तानी लष्कराबद्दल कसे माहिती आहे? 

तुम्हाला आमच्या एजन्सीबद्दल कसे माहिती आहे? आम्हाला स्वतःला माहित नाही, एजन्सी आमच्या देशात आहेत, सैन्य आमच्या देशाचे आहे, ते या गोष्टी आमच्याशी शेअर करत नाहीत. ते गुप्त आहेत. नौसीनने बोलताना नंतर कंगनाच्या अभिनयाचे कौतुक केले.

कंगनाच्या चंद्रमुखीची चर्चा

कंगना बॉलीवूड आणि सोशल मीडियावर राजकारणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सतत बोलत असते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना सतत चर्चेत असते. 

अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'चंद्रमुखी 2' च्या रिलीजसाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये ती राजाच्या दरबारात नर्तकीची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटात सौंदर्यासाठी आणि नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या एका नृत्यांगणीची गोष्ट सांगणार आहे. 

चंद्रमुखी आणि इमेर्जन्सी

चंद्रमुखी हा बहुचर्चित चित्रपट 19 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय तिचा 'इमर्जन्सी' हा चित्रपटही याच वर्षी रिलीज होणार आहे, ज्यामध्ये ती इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. त्याच्याकडे 'तेजस' हा अॅक्शनपटही आहे.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT