Kumar Sanu: 21 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली तरीही... कुमार सानु राष्ट्रीय पुरस्कारावर बोलताना म्हणाले "मला लोणी लावता"...

Kumar Sanu: आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या जॉनरची गाणी देऊन इंडस्ट्रीला समृद्ध बनवणाऱ्या कुमार सानु यांनी एक खंत व्यक्त केली आहे.
Kumar Sanu
Kumar SanuDainik Gomantak
Published on
Updated on

Kumar Sanu talking about National Award: 'अब तेरे बिन जी लेंगे हम', मेरा दिल भी कितना पागल है, धीरे धीरे मेरे जिंदगी मे... यांसारख्या सुपरहिट गाण्यांमधुन प्रेमीयूगुलांना सोबत करणाऱ्या कुमार सानूंना कोण विसरेल?

आपल्या मखमली आवाजाने संगीत रसिकांना वेड लावणाऱ्या सानूदांनी आयुष्यातली एक मोठी खंत व्यक्त केली आहे. आजवर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार का मिळाला नाही? याचं कारण सांगत त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे.

गायक कुमार सानू यांनी गेली 4 दशके संगीत रसिकांना आपल्या जादूई आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे. कुमार सानु यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी 21 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

 90 च्या दशकात त्यांच्या आवाजाने इंडस्ट्रीवर गारुड घातले होते. मात्र एवढे योगदान देऊनही त्यांना आजही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही. या गोष्टीसाठी आजही त्यांना खंत वाटते,चला जाणून घेऊया सानू दा नेमकं काय म्हणाले?

मला लोणी लावता येत नाही

तुम्ही सलूनमध्ये गेलात, पेट्रोल भरायला किंवा चहाच्या स्टॉलवर गेलात तर आजही तुम्हाला 90 च्या दशकातला एक जादूई स्वर ऐकायला मिळतो आणि हा आवाज असतो प्रसिद्ध गायक सानू दांचा, हा मधाळ आवाज ऐकत तुम्ही तल्लीन होत जाता. सूरांची उधळण करणारा हा गायक आज मात्र एक तक्रार मांडत आहे.

कुमार सानू म्हणतात "मी 21 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. पण कुणाला कसं लोणी लावायचं ही कला मला अवगत नाही, त्यामुळेच मी राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचू शकेल

सानूदा म्हणतात

आपली व्यथा मांडताना कुमार सानू यांनी 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपल्याला याआधी राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मभूषण मिळायला हवे होते, पण या सन्मानाशिवाय समाधान मानावे लागेल. 

आपली तक्रार करताना सानू दा म्हणाले, 'लोणी लावण्याचे कौशल्य आणि उत्तम दृष्टिकोन नसेल तर हा पुरस्कार मिळणे शक्य नाही. सरकारला वाटले तर मला पुरस्कार मिळेल. याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

करिअरची सुरूवात

कुमार सानूने सनू भट्टाचार्य म्हणून 1983 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. 1986 मध्ये शिबली सादिक दिग्दर्शित 'तीन कन्या' या चित्रपटाने त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात केली. 

1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हीरो हिरालाल' या चित्रपटातील गाणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरले. 

जगजीत सिंह यांनी मदत केली

करिअरला सुरुवात केल्यानंतरच्या वर्षभरानंतर जगजीत सिंग यांनी कुमार सानू यांची कल्याणजींशी ओळख करून दिली. त्यांच्या सांगण्यावरूनच कुमार सानूने नाव बदलले गेले. 

त्यांचा किशोर कुमार यांचा कुमार सानू यांचा एवढा प्रभाव होता की त्यांनी किशोरदांच्या नावावरुन आपल्या नावापूढे कुमार लावले.

कल्याण जी-आनंद जी यांनी कुमार सानू यांना 'जादुगर' चित्रपटात गाण्याची संधी दिली.

Kumar Sanu
Jawan Collection: शाहरुखने पुन्हा इतिहास रचला...'जवान'ची आतापर्यंतच्या हिंदी चित्रपटातली सर्वात मोठी ओपनिंग

कुमार सानू छा गये

1990 मध्ये कुमार सानूला यश मिळाले जेव्हा 'आशिकी' चित्रपट हिट झाला आणि त्याने चित्रपटातील गाणी गायली.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि 'साजन', 'दीवाना' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये गाणी गायली.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com