lata Mangeshakr  Dainik Gomantak
मनोरंजन

लतादीदी 'या' पद्धतीने घ्यायच्या आरोग्याची काळजी

नव्वदीतही लतादीदींचे आरोग्य चांगले होते.

दैनिक गोमन्तक

भारताच्या ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत. आज वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 8 जानेवारीच्या संध्याकाळपासून त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी (Breach Candy Hospital Mumbai) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना (Corona) आणि न्यूमोनियाचा त्रास होता. मिळालेल्या माहितीनुसार लता मंगेशकर यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने लतादीदी यांना कोरोनाकी लागण झाली. त्यांच्या निधनाच्या बातमीने लोकांना मोठा धक्का बसला आहे.

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना वयाच्या 92 व्या वर्षीही कोणताही आजार नव्हता. त्यांचे जीवनमान अगदी साधे होते. लतादीदी यांना सीफूड आणि मसालेदार पदार्थ खूप आवडायचे, पण वयाचा विचार करून त्यांनी साधा आहार (Diet) स्वीकारले होते.

* लतादीदीचे दिनक्रम

मिळालेल्या अहवालानुसार लता दीदी रोज सकाळी 6 वाजता उठत असत. त्यानंतर त्या सकाळचा नाश्ता करायची. त्यांना मसालेदार पदार्थ आणि सीफूड आवडायचे, पण वय लक्षात घेवून त्यांनी मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ खाणे टाळले. त्या कोमट पाण्याचे सेवन करायच्या. दुपारच्या जेवणात त्या डाळ, भाजी, रोटी असे अगदी साधा आहार घेत असे. रात्रीचे जेवण त्या 9:30 पर्यंत घ्यायच्या. रात्री त्या केवळ डाळ आणि भात आहारात घेत असे.

* करोडो रुपयांच्या मालकीण

बॉलीवुडमध्ये लतादीदी आणि लता ताई या नावाने प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे वास्तव्य मुंबईत होते. त्यांचा दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर प्रभू कुंज भवन नावाचा बंगला आहे. त्यांच्याकडे शेवरले, ब्युक आणि क्रिस्लर कार होती. 'वीर जारा' चित्रपटाचे गाणे रिलीज झाल्यानंतर चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी त्यांना मर्सिडिज कार भेट दिली होती. त्यांची एकूण 50 दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते.

* नियमित गाण्याचा सराव करायच्या

या वयातही लता दीदी नियमितपणे गाण्याचा सराव करत असत. त्यांना स्टेज परफॉर्मन्सच्या अनेक ऑफर्स येत होत्या, पण त्या ऑफर्सला नकार देत होत्या कारण त्यांना स्टेजवर जाऊन गायला आवडत नव्हते. लतादीदीचा संपूर्ण दिवस साध्या सोफ्यावर बसून त्यांच्या प्रियजनांना फोनवर बोलणे आणि रोज कोणत्या न कोणत्या विषयावर ट्विट (Twitter) करत जात असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT