Lawrence Bishnoi & Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

सलमान खानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईने मागवली होती 4 लाखांची रायफल

गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई सध्या पोलिसांच्या रडारवर आहे.

दैनिक गोमन्तक

गायक सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई (lawrence bishnoi) सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. यासोबतच सर्वांचे लक्ष आता सलमान खानकडे (Salman Khan) वळले आहे आणि त्या मागिल कारण म्हणजे खरे तर लॉरेन्सने यापूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांनीही सलमान खानच्या सुरक्षे मध्ये वाढ केली आहे. (Lawrence Bishnoi had ordered a rifle worth Rs 4 lakh to kill Salman Khan)

लॉरेन्सने यापूर्वी सुद्धा सलमानला मारण्याची योजना आखली होती. त्यांच्या मुंबईतील घराचीही रेकी करण्यात आली होती. त्यावेळी सलमानच्या खुनाचा प्लॅन देखील फसला. आता मीडिया रिपोर्ट्स समोर येत आहेत की, सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्सने कोणती योजना आखली होती. पोलिसांच्या चौकशीत लॉरेन्सने याबाबतचा खुलासा केला होता.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी कसून तपासणीला सुरूवात केली आहे. मुंबई पोलीस 10 टीम तयार करून प्रत्येक कोपऱ्यातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचाही तपास करत आहेत.

बिष्णोई समाजाची काळवीटांवरती धार्मिक श्रद्धा आहे. काळवीट प्रकरणी सलमान खानचे नाव समोर आल्यानंतर बिष्णोई समाजाची सलमान खानवर नाराजी असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लॉरेन्स बिश्नोईने 2021 च्या चौकशीत खुलासा केला होता की, त्याने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहराला सलमान खानला मारण्यासाठी सांगितले होते. नेहराने त्याच्या ऑर्डरसाठी मुंबईला जाऊन वांद्रे येथील सलमान खानच्या घराची रेकी केली होती.

त्यावेळी नेहराकडे पिस्तूल देखील होती. त्याला दुरून सलमान खानचा स्पष्ट शॉट मिळू शकलेला नाही. त्यानंतर लॉरेन्सने आरके स्प्रिंग रायफलची ऑर्डर दिली होती. नेहराच्या गावातील रहिवासी दिनेश फौजी यांच्यामार्फतच ही रायफल मागवण्यात आली होती. वृत्तानुसार, लॉरेन्सने यासाठी सहकारी अनिल पांड्याला 3-4 लाख रक्कम दिली होती. रायफल दिनेश फौजीकडे याच्याकडे ठेवली होती आणि पोलिसांनी दिनेशकडून रायफल जप्त करून त्याला अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT