Dhoop Paani Bahne De: KK च्या निधनानंतर 6 दिवसांनीचं शेवटचं गाणं 'धूप पानी बहन दे' रिलीज

KK Last Song Dhoop Paani Bahne De: प्रसिद्ध बॉलिवुड गायक कृष्णकुमार कुननाथ (KK) यांना जगाचा निरोप घेतला आहे.
Singer KK
Singer KKTwitter
Published on
Updated on

प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुननाथ (KK) यांनी 31 मे जगाचा निरोप घेतला. केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या 6 दिवसांनंतरही केके यांचे चाहते त्यांची आठवण करून भावूक झाले आहे, त्याचदरम्यान आज केकेचं शेवटचं गाणं रिलीज झालं आहे. निधनापुर्वी केकेने सृजित मुखर्जी यांच्या 'शेरदिल' चित्रपटासाठी शेवटचं गाणं गायलं होतं जे प्रदर्शित झालं आहं. (KK Last Song Dhoop Paani Bahne De News)

'धूप पानी बहन दे' हे गाणं गुलजार साहब यांनी लिहिले असून पंकज त्रिपाठी, नीरज काबी आणि सयानी गुप्ता यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. 12 एप्रिल रोजी केकेने रेकॉर्डिंग स्टुडिओमधील काही फोटो इंस्टाग्रामवर (Instagram) अकाऊटंवर शेअर केले आहे. ज्यामध्ये ते गुलजार साहब आणि सृजित मुखर्जीसोबत दिसत होता. केकेचं हे गाणं लोकांच्या हृदयाला भिडणार असल्याचे सृजित मुखर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. आता हे गाणं ऐकून आणि केकेची आठवण करून चाहतेही भावूक झाले आहेत. पंकज त्रिपाठी स्टारर सृजित मुखर्जीचा हा चित्रपट (Movie) 24 जून रोजी रीलीज होणार आहे.

31 मे रोजी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने केके यांचे निधन झाले. केके कोलकाता येथे कॉन्सर्ट करण्यासाठी गेले होते. त्याच दिवशी गायकाने गुरुदास कॉलेजसाठी नजर मंचावर सादरीकरण केले. परफॉर्म करत असताना केकेची तब्येत खराब झाली होती, पण तो परफॉर्म करत राहिला.

Singer KK
Ekta Kapoor ने 'टेलिव्हिजन क्वीन' म्हणून मिळवली मनोरंजन विश्वात ओळख

कॉन्सर्टनंतर केके जेव्हा त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची तब्येत ढासळू लागली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके यांच्या पार्थिवावर मुंबईतील (Mumbai) वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com