Veteran singer Lata Mangeshkar Family Dainik Gomantak
मनोरंजन

'संधी नसल्यामुळे मंगेशकर कुटुंब गोव्याबाहेर'

गोवा राज्याने अनेक दिग्गज कलाकार तयार केले, पण मंगेशकर कुटुंबाला तितकीशी संधी गोव्यात मिळाली नाही

Priyanka Deshmukh

दिग्गज गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत. त्या संगित क्षेत्रातील अनेकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व होत्या. मंगेशकर कुटुंब मुळचे गोव्याचे (Goa) पण लता दिदी कधीच गोव्याला गेल्या नाहीत. गायिका लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांचा संगीत प्रवास खूप रंजक होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी आणि कोकणी संगीतकार होते. (Veteran singer Lata Mangeshkar Goa connection)

गोवा राज्याने अनेक दिग्गज कलाकार तयार केले, पण मंगेशकर कुटुंबाला तितकीशी संधी गोव्यात मिळाली नाही. त्यामुळेच कदाचित मंगेशकर कुटुंब गोव्यातून पडले असावे, असे प्रतिपादन गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांनी केले होते. ते गोवा माहिती तंत्रज्ञान दिवसाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.

'गोव्यामध्ये अफाट विद्वत्ता, कला, शास्त्र, संरक्षण दल असे कुठलेही क्षेत्र असो, गोव्यासारख्या छोट्या राज्याने अनेक विद्वान घडवले. मात्र संधी उपलब्ध असत्या, तर आज मंगेशकर कुटुंब गोव्यामध्ये दिसले असते. संधी नसल्यामुळे ते गोव्याबाहेर पडले,' असे उद्गार तत्कालिन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काढले होते. (Lata Mangeshkar family moved out of Goa due to lack of opportunities)

प्रसिध्द गायिका लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे गोवा राज्य सरकारने आजपासून 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने देखील 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. आज सायंकाळी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT