Lata Mangeshkar
Lata Mangeshkar  Dainik Gomantak
मनोरंजन

Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रसिद्ध गाणी तुम्ही ऐकलीत का?

दैनिक गोमन्तक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. जगभरातील चाहते आज लता दीदींना आदरांजली वाहत आहेत. लता दीदींनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी आवडीने ऐकतात. आज दीदींच्या पुण्यतिथीनिमित्त पाहूयात त्यांची प्रसिद्ध गाणी कोणती आहेत.  

  • अजीब दास्तां है ये


'दिल अपना और प्रीत पराई' या चित्रपटातील अजीब दास्तां है ये हे लता मंगेशकर यांनी गायले आहे. हे गाणं आजसुध्दा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या गाण्याचे गीतकार शैलेंद्र हे आहेत तर गाण्याला संगीत शंकर जयकिशन यांनी दिले आहे. 

  • पिया तोसे नैना लागे रे

1965 मध्ये रिलीज झालेल्या गाइड या चित्रपटातील (Movie) 'पिया तोसे नैना लागे रे' या गाण्याला (Song) अभिनेत्री वहिदा रेहमान यांचे नृत्य आणि लता मंगेशकर यांचा सुमधूर आवाज लाभला आहे, त्यामुळे हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आवडीचे गाणे आहे.

  • मेरा दिल ये पुकारे आ जा

नागिन हा चित्रपट 1954 मध्ये रिलीज झाला असून मेरा दिल ये पुकारे आ जा हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले. या गाण्यावरील रिल्स सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. या गाण्याचे गीतकार राजिन्दर कृष्ण हे आहेत. 

  • लो चली मैं अपनी देवर की बारात ले के  

1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटामधील 'लो चली मैं अपनी देवर की बारात ले के' हे गाणे देखील लता मंगेशकर यांनी गायले आहे. सलमान खान, माधुरी दीक्षित  यांनी हम आपके है कौन या चित्रपटात उत्तम काम केले आहे.

  • जिया जले जाँ जले

जिया जले जाँ जले हे गाण लता मंगेशकर यांनी गायले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. हे गाणे 'दिल से' या चित्रपटातील आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि प्रीती झिंटाने काम केले आहे.

  • मेरी आवाज ही पहचान है

किनारा या चित्रपटातील मेरी आवाज ही पहचान है या लता मंगेशकर यांच्या गाण्याने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. या गाण्याचे गीतकार गुलजार हे आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT