Asha Bhosle and Lata Mangeshkar Dainik Gomantak
मनोरंजन

Lata Mangeshkar Award 2023: आशा भोसलेंना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर; प्रसाद ओकने लिहली पोस्ट, म्हणाला...

Lata Mangeshkar Award: उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Lata Mangeshkar Award: लता मंगेशकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या वर्षी लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सुरु केला आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला होता. 2023 चा लता दिनानाथ मंगेशकर हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात येणार आहे.

अलिकडेच त्यांना 2021 ला जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. याबरोबरच, लता दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार हा अभिनेता प्रसाद ओकला जाहीर झाला आहे.

उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी 2022 ला पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला होता. पुरस्कार प्रदान सोहळा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी सोमवारी 24 एप्रिलला माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

पंडित हृदयनाथ मंगेशकर या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. यासोबतच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार भारतीय संगीत क्षेत्रासाठी पंकज उधास यांना, वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटकासाठी प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनच्या गौरी थिएटर्सला आणि समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेसाठी श्री सद्‍गुरू सेवा संघ ट्रस्ट यांना जाहीर करण्यात आला आहे.

साहित्य क्षेत्रात समर्पित सेवेसाठी ग्रंथाली प्रकाशनला विशेष पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवेसाठी प्रसाद ओक यांना विशेष पुरस्कार आणि चित्रपट क्षेत्रातील सेवेसाठी विद्या बालन यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

दरम्यान, पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनेता प्रसाद ओकने आभार मानत हा पुरस्कार आपल्या वडीलांना समर्पित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT