Salman Khan -Pooja Hegde
Salman Khan -Pooja HegdeDainik Gomantak

Lets Dance Chotu Motu Song Out: सलमानच्या चित्रपटात नर्सरीतील कविता,ऐकून तुम्हीही म्हणाल...

Kisi ka bhai kisi ki jan: सलमानने या गाण्याला आपला आवाज दिला आहे.
Published on

Kisi ka bhai kisi ki jan: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. मग ती चर्चा त्या चित्रपटांची असो किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्याची. आता त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

किसी का भाई किसी की जान चित्रपटातील एक गाणे रिलिज झाले असून ते लहानापासून सर्वांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. लेट्स डान्स छोटू मोटू हे गाणे कमी आणि नर्सरी रायम्स जास्त दिसत आहे. सलमाने या गाण्याला आपला आवाज दिला आहे.

हम्पटी डम्पटी, जॉनी जॉनी आणि ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार यासारखी लहान मुलांच्या आवडत्या कविता यामध्ये ऐकायला मिळेल. सलमान खान, देवी श्री प्रसाद, नेहा भसीन, यो यो हनी सिंह यांच्या आवाजात हे ऐकायला मिळत आहे.

Salman Khan -Pooja Hegde
Kisi ka Bhai Kisi ka Jaan : 'किसी का भाई किसी की जान'चं जोरदार बुकींग... भाईजानची बॉक्स ऑफिसवर दबंगगिरी..

महत्वाचे म्हणजे या गाण्यात किसी का भाई किसी की जान चित्रपटातील सर्व कास्ट दिसून येत आहे. सगळेजण साऊथ इंडियन लूक मध्ये दिसून येत आहेत.

दरम्यान, सोमवारपासून अॅंडव्हास बुकिंग सुरु झाले असून चित्रपट रिलिज होण्याआधीच हाऊसफुल झाले असल्याची माहीती मिळाली आहे. आता भाईजानचा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com