Kangana Ranavat & Javed Akhtar  Twitter/@barandbench
मनोरंजन

कंगनाला न्यायालयाने दिला अखेर 'अल्टिमेटम'

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranavat) तिच्या चित्रपटांच्या व्यतरिक्त इतर वादग्रस्त मुद्यांसाठी कायम चर्चेत असते.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranavat) तिच्या चित्रपटांच्या व्यतरिक्त इतर वादग्रस्त मुद्यांसाठी कायम चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती कायदेविषयक बाबींमुळे चर्चेत येत आहे. कंगनाच्या अडचणीत आणख वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगणाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान अंधेरीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये हजर राहण्याविषयी अल्टिमेटम दिला आहे. पुढे होणाऱ्या सुनावणीसाठी कंगणा हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जाहीर केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान कंगना रणावतच्या वकिलाने न्यायालयामध्ये सांगितले आहे की, कंगना सध्या देशात नसल्यामुळे सुनावणी दरम्यान ती हजर राहू शकणार नाही. मात्र गीतकार जावेद अख्तर यांचे वकिल जय भरद्वाज यांनी यास विरोध दर्शवला आहे. कंगना कोणत्याही तारखेला हजर न झाल्यास जामीनपत्र वॉरंट देण्याची मागणी न्यायालयात केली आहे. दरम्यान न्यायालयाने कंगनाला इशारा दिला आहे.

कंगनाला यापूर्वी देखील जारी करण्यात आला वॉरंट

कंगना रणावतच्या विरोधात जावेद अख्तर यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. परंतु कंगनाच्या न्यायालयात हजर झाल्याच्या संदर्भात अनेकदा गहाळपणा दिसून येत आहे. याआगोदरही त्यांच्याविरोधात वॉरंट देण्यात आले आहेत. न्यायालयाने वारंवार बोलविण्यात आले तरी ती न आल्यामुळे वॉरंट बजावण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT