Sushmita Sen Wedding Lalit Modi दैनिक गोमंतक
मनोरंजन

माझ्या 'SMS'च उत्तर दे, सुष्मिता सेन-ललित मोदींची जुनी चॅट व्हायरल

सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांचे रोमँटिक फोटो आणि जुनी चॅट सोशल मीडियावर व्हायरल

दैनिक गोमन्तक

सुश्मिता सेन (sushmita sen) आणि ललित मोदी (lalit modi) यांचे रोमँटिक फोटो (Romantic photo) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ललित मोदींनी सुश्मिता सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक दिवस आम्ही नक्की लग्न करू अशी कॅप्शनही दिली आहे. सुश्मिता सेनला आपली बेटरहाफ (अर्धांगिनी) आणि पार्टनर इन क्राइम असं कॅप्शनमध्ये म्हंटल आहे. सोशल मीडियावरील पोस्टनंतर त्या दोघांच्या अफेरच्या चर्चाना उधाण आलं. त्यातच या दोघांच्या जुन्या चॅट चा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. (lalit modi and sushmita sen)

सुश्मिता सेन (sushmita sen) आणि ललित मोदी(lalit modi) यांच्या अफेरच्या चर्चा सगळीकडे सुरु झाल्या. त्यातच त्यांचे जुने फोटो आणि चॅटचे स्क्रीनशॉटही समोर आले आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या रिलेशनच्या चर्चाना उधाण आलं. 10 वर्षांनी लहान असणाऱ्या सुश्मिता सोबतच्या रोमँटिक फोटो ललित यांनी आपल्या अकाउंट वरून शेअर केले त्यानंतर ते प्रमाणावर व्हायरल झाले. दोघेही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत होते. त्यांचे जुने फोटो पाहून ते समजते. दोघांच्या रिलेशनच्या बातमीनंतर त्यांचं जून चॅटदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. (Sushmita sen & lalit modis ald chats screenshots)

ललित मोदींचे जुने चॅट

ललित मोदींची हि चॅट नऊ वर्षांपूर्वीची आहे. हि घटना तेव्हाची आहे जेव्हा ललित मोदींनी ट्विटरवरती सुश्मिता सेनला टॅग करून लिहले होते. ओके मी मान्य करतो तू खूप दयाळू आहेस. तसही दिलेला शब्द तोडण्यासाठीच असतो, दिलेली वचने पूर्ण केली जातात. चीयर्स लव, Here is to 47. यानंतर या ट्विट ला उत्तर म्हणून सुश्मिता सेन एक स्माईली आणि gotcha 47!! लिहते. त्यानंतर ललित मोदी लिहतात माझ्या मेसेज ला उत्तर दे.

बऱ्याच वर्षानी आता या दोघांच्या सोबत असण्याचे आणि एकांताचे फोटो त्यांनी शेअर केल्यानंतर अशी ट्विट्स बाहेर येऊ लागली.सोशल मीडिया वापरकर्ते देखील मजा घेत आहेत. एका यूजरने लिहिले - '2013 पासून काय चालले आहे? दुसर्‍याने लिहिले - 2013 पासून लॉन्ग टर्म रिलेशन. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले- सही खेल गए मोदी साब तर दुसऱ्याने लिहिले - 9 वर्षे वाट पाहिली. तर एकजण यावर लिहतो - आशा सोडू नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT