Laal Singh Chaddha Dainik Gomantak
मनोरंजन

Laal Singh Chaddha: सोशल मीडियावर बहिष्काराची मागणी; कारण ऐकून व्हाल थक्क

आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

आमिर खानचे (Aamir Khan) चाहते त्याच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते आणि ती प्रतीक्षा आता संपली आहे. चित्रपटाचा ट्रेलर आला आहे पण ट्रेलर येताच हा चित्रपट लोकांच्या निशाण्यावरती आला. आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटावर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. सोशल मीडियावर 'बॉयकॉट लाल सिंह चड्ढा' सध्या ट्रेंड करत आहे. (Laal Singh Chaddha Demand for boycott on social media Because you will be surprised to hear)

आमिर खानचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक बनवण्यात आला आहे, ज्यात टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती. तर हा चित्रपट OTT वर उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची कॉपी केल्याबद्दल चाहत्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय आमिर खानने यापूर्वीही अशी अनेक विधाने केली आहेत, जी भारतीय सभ्यता आणि संस्कृतीच्या विरोधात असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. याशिवाय आमिर खानची माजी पत्नी किरण रावच्या जुन्या विधानालाही पुन्हा एकदा विरोध होताना दिसून आला आहे.

आमिर खानच्या चित्रपटाला विरोध करताना एका यूजरने ट्विटरवर लिहिले आहे की, 'आमिर खान म्हणतो, देश असहिष्णू झाला आणि त्याला भारत सोडायचा आहे.' आणखी एका युजरने लिहिले की, 'मित्रांनो, करीना कपूर स्वतः म्हणते की मी माझे चित्रपट पाहत नाही, त्यामुळे त्यांचे चित्रपट पाहायला जाऊच नका.' याशिवाय अनेक यूजर्सनी मीम्स शेअर करताना आमिर खानला जबरदस्त ट्रोल केले जात आहे.

अलीकडेच, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूरमध्ये हिंदू संघटनांशी संबंधित लोकांनी आमिर खान आणि त्याच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाविरोधात निदर्शने केली आहेत. यादरम्यान आमिर खानचे पोस्टर रस्त्यावर फाडण्यात आले आणि जाळण्यात देखील आले. सनातन रक्षक सेनेनेही आमिरच्या जुन्या विधानाला विरोध केला आहे.

आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातून चार वर्षांनी चित्रपटगृहात परतला आहे. अमिरचा शेवटचा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा फ्लॉप ठरला होता. मात्र 'लाल सिंग चड्ढा'च्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. हा चित्रपट अद्वैत चंदनने दिग्दर्शित केला असून यात आमिर खानसोबत करीना कपूर देखील दिसून येणार आहे. आमिर खानचा चित्रपट 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता आणि त्यानंतर 'लाल सिंग चड्ढा' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' यांची बॉक्स ऑफिसवर थेट स्पर्धाच होणार होती असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. पण शेवटच्या क्षणी 'लाल सिंग चड्ढा'ची रिलीज डेट बदलून 11 ऑगस्ट करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT