Madgaon Express Dainik Gomantak
मनोरंजन

Madgaon Express : कुणाल खेमू दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मडगाव एक्सप्रेस'चे शूटिंग पूर्ण

कुणाल खेमू दिग्दर्शित बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मडगाव एक्सप्रेस'चे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे

Rahul sadolikar

बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू लवकरच एक्सेल एंटरटेनमेंटचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मडगाव एक्सप्रेस'द्वारा दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तसेच, जवळपास वर्षभर शूटिंग करण्यात आलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे.

एक्सेल एंटरटेनमेंटने, अनेक दशकांपासून आपल्या वेधक कथानकांसह प्रेक्षकांना खिळवुन ठेवत आली आहे .आता, कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्स्प्रेस'या सिनेमाने दर्शकांची उत्कंठा वाढवली आहे.

कुणाल खेमूने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटातील कलाकार, क्रू आणि इतर टीम मेंबर्ससह एक फोटो शेअर करत अपडेट दिली ही माहिती दिली आहे.'मडगाव एक्सप्रेस'या सिनेमाद्वारा इंडस्ट्रीतील काही उत्कृष्ट कलाकारांना एकत्र पाहायला मिळेल. तसेच, चित्रपटाच्या मनोरंजक टायटलने प्रेक्षक उत्साही झाले असून, प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

फरहान अख्तरने 2001 मध्ये 'दिल चाहता है'या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. अशातच, आता कुणाल खेमू एक्सेल द्वारे ‘मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटाच्या माध्यमातुन दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या दोघांची मालकी असलेल्या एक्सेल एंटरटेनमेंटने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा ', 'दिल चाहता है', 'डॉन', 'डॉन 2' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच, सध्या प्रॉडक्शन हाऊस मोस्ट अवेटेड 'जी ले जरा'साठी तयारी करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

SCROLL FOR NEXT