Konkna Sen -Sharma Dainik Gomantak
मनोरंजन

Konkona Sen Sharma: 'मला रामायण पाहायची परवानगी आईने दिली नाही' दिग्गज अभिनेत्रीचा खुलासा

Konkona Sen Sharma: रामायण, महाभारतच नाही अमेरिकन सोप ऑपेरा देखील पाहण्याची परवानगी नसल्याचेदेखील तिने म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Konkona Sen Sharma: महाभारत आणि रामायण म्हणजे बहुतेकजणांचा जिव्हाळाचा विषय असतो. त्यामुळे या महाकाव्यावरील मालिका आणि इतर कार्यक्रमांना घराघरातून प्रतिसाद मिळत असतो.

अनेकदा पालक आपल्या मुलांना अशा टीव्ही मालिका बघण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. आता मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या आईने आपल्याला रामायण, महाभारताच्या टीव्ही मालिका बघू दिल्या नसल्याचे वक्तव्य केले आहे.

वेक अप सिड मधून बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे कोंकणा सेन शर्मा होय. आता एका मुलखतीदरम्यान, तिने हा खुलासा केला आहे. रामायण, महाभारतच नाही अमेरिकन सोप ऑपेरा देखील पाहण्याची परवानगी नसल्याचेदेखील तिने म्हटले आहे. कोंकणा सेन शर्माच्या आईच्या म्हणण्यानुसार आधी महाकाव्ये वाचावीत आणि मग पहावीत.

पुढे तिने आपल्या आईबद्दल बोलताना म्हटले आहे की, मी लहान होते तेव्हापासूनच मला माझी स्वत:ची मोकळीक दिली. त्यामुळे माणूस म्हणून घडण्यात माझी मदत झाल्याचे कोंकणा शर्मा सेनने म्हटले आहे.

कोंकणा ही चित्रपट निर्मात्या अपर्णा सेन आणि पत्रकार मुकुल शर्मा यांची मुलगी आहे आणि तिने वयाच्या चौथ्या वर्षी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तिच्या उत्कृष्ट ऑन-स्क्रीन अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकण्यासोबतच ती तिच्या दिग्दर्शनासाठीही ओळखली जाते.

वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर, 43 वर्षीय कोंकणा शेवटचे 'कुट्टे' मध्ये दिसली होती आणि आता ती मनोज बाजपेयीसोबत वेब-सिरीज 'सूप' मध्ये दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

SCROLL FOR NEXT