Model Manjusha Niyogi  Dainik Gomantak
मनोरंजन

कोलकातामध्ये आणखी एका मॉडेलचा मृत्यू, 13 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींचा मृत्यू

गेल्या 15 दिवसांत 3 अभिनेत्री आणि मॉडेल्सनी आत्महत्या केल्या आहेत. माहिती मिळताच पोलीस (Police) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालमधून शुक्रवारी आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. कोलकाता येथील आणखी एक मॉडेल आज शहरातील पाटुली भागातील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. ही तीन दिवसांतील दुसरी घटना आहे. त्याच वेळी, गेल्या 15 दिवसांत 3 अभिनेत्री आणि मॉडेल्सनी आत्महत्या केल्या आहेत. माहिती मिळताच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Kolkata Model Manjusha Niyogi Found Dead At Her Residence)

दरम्यान, मृत अभिनेत्री मंजुषा नियोगीच्या आईने सांगितले की, दोन दिवसांपूर्वी तिची जवळची मैत्रीण आणि मॉडेल बिदिशा डी मजुमदारच्या मृत्यूनंतर ती डिप्रेशनमध्ये (Depression) गेली होती. वधूच्या मेकअप फोटोशूटमधील लोकप्रिय चेहरा बिदिशा मजुमदार देखील बुधवारी संध्याकाळी कोलकाताच्या (Kolkata) डम-डम परिसरात तिच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

तसेच, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी नियोगीचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नियोगीच्या आईने सांगितले की, "माझी मुलगी तिची मैत्रिण बिदिशाच्या मृत्यूनंतर खूप निराश झाली होती. तेव्हापासून ती सतत तिच्याबद्दल बोलत होती."

त्याच वेळी, याआधीची लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री पल्लबी डे ही देखील 15 मे रोजी कोलकाता येथील गरफा भागात तिच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. दुसरीकडे, पल्लबीच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला होता, त्यानंतर पोलिसांनी लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकराला अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

नोकरी मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची गोमंतकीय तरुणांना सुवर्णसंधी; मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे विशेष पाऊल

Goa Petrol Stock Status: गोव्यात मुबलक इंधनसाठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन; नरहर ठाकूर यांनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT