''जीना चाहता हूं'', ईदच्या सुट्टीतही उघडले कोलकाता हायकोर्ट

ईदच्या सुट्टीतही कलकत्ता उच्च न्यायालय (Kolkata High Court) मंगळवारी उघडले आणि कामकाज झाले.
Kolkata High Court
Kolkata High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

ईदच्या सुट्टीतही कलकत्ता उच्च न्यायालय मंगळवारी उघडले आणि कामकाज झाले. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शेख अब्दुल नईम याने नादिया जिल्ह्यातील बनगाव न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात (High Court) स्वत: बाजू मांडली. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून कडेकोट बंदोबस्तात त्याला कोलकात्यात आणण्यात आले आहे. त्याने स्वत: न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडली. नईमने सांगितले की, 'दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दलचे आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. आणि ते मी वेळोवेळी चुकीचे सिद्ध करु शकतो.' तो पुढे म्हणाला की, 'कनिष्ठ न्यायालयाने मला फाशीची शिक्षा सुनावली आहे, जी योग्य नाही. मला जगायचं आहे.' (Lashkar-e-Taiba militant Sheikh Abdul Naeem has demanded the abolition of the death sentence in the Kolkata High Court)

दरम्यान, कोर्टात त्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर 17 मेपर्यंत त्याला मुदत देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी त्याच दिवशी होणार आहे. यासोबतच त्याच्यासाठी वकील नेमण्याचे निर्देशही न्यायमूर्तींनी दिले आहेत.

Kolkata High Court
मध्य प्रदेशात गोहत्येच्या संशयावरुन दोन तरुणांची हत्या, हिंदू संघटनांवर आरोप

बांगलादेश सीमेवर या दहशतवाद्याला अटक करण्यात आली

17 मे पर्यंत नईमला त्याच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दलचे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, 2007 मध्ये शेख अब्दुल नईमसह चार दहशतवाद्यांना बांगलादेशातील बेनापोल सीमेजवळून अवैधरित्या भारतात प्रवेश करताना अटक करण्यात आली होती. या घटनेचा तपास सीआयडीकडे होता. त्याने पाकिस्तानमध्ये (Pakistan) प्रशिक्षण घेतले असून तो लष्कर-ए-तैयबाशी (Lashkar-e-Taiba) संबंधित सक्रिय दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दहशतवादी कारवायांच्या नियोजनाशी संबंधित कागदपत्रांसह स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.

नादिया न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली

दरम्यान, नादिया जिल्ह्यातील वाणगाव न्यायालयात त्याच्याविरुद्ध सुनावणी सुरु होती. दरम्यान, मुंबई हल्ल्यातही त्याचे नाव आले होते, त्यामुळे न्यायालयाने दीर्घ सुनावणीनंतर 2018 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. घटनात्मक नियमांनुसार फाशीच्या शिक्षेबाबत कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयासाठी उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. त्यानुसार मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली, त्यादरम्यान त्याने स्वत: च्या बचावासाठी बाजू मांडली. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत तो कोलकात्यातच राहणार आहेत. त्याला मध्यवर्ती कारागृहात कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com