Karan johar  Instagram
मनोरंजन

'Koffee with Karan' शो होणार बंद? करण जोहरचा मोठा निर्णय

करण जोहरनं शेअर केलेल्या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असतो. 'कॉफी विथ करण' (Koffee with Karan) करणच्या या 'शो'ला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमामध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगतात. आमिर खान (Aamir Khan) , शाहरूख खान (Shah Rukh Khan) , अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सलमान खान (Salman Khan) यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी या शोमध्ये आपले किस्से सांगितले आहेत. आता या शोबद्दल करणनं मोठा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Koffee with Karan news)

करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या (Koffee with Karan) सहा सीझनने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले. पण आता हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार नाही. करणने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. करणनं पोस्टमध्ये लिहिलं, 'हॅलो, कॉफी विथ करण हा शो माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग होता. मला वाटतं की आम्ही पॉप संस्कृतीमध्ये प्रभाव पाडला. मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की 'कॉफी विथ करण' हा शो पुन्हा प्रेक्षरकांच्या भेटीस येणार नाही. ' या पोस्टला करणनं 'महत्वाची घोषणा' असं कॅप्शन दिले आहे.

करण जोहरने (Karan Johar) शेअर केलेल्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच काही सेलिब्रिटींनी देखील या पोस्टवर कमेंट केली. प्राजक्ता कोळी म्हणजेच मोस्टली सेन तसेच राजाकुमारी यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

SCROLL FOR NEXT