Coffee with Karan 8th seoson Dainik Gomantak
मनोरंजन

Koffee With Karan Promo: बेबो अन् आलियाने लावली करणच्या शो मध्ये हजेरी!

Koffee With Karan Promo: या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही केले.

दैनिक गोमन्तक

Koffee With Karan Promo: करिना आणि आलिया नात्याने ननंद-भावजय आहेत. यावरुन देखील करण त्या दोघींना प्रश्न विचारताना दिसत आहे.

कॉफी विथ करण 8 च्या प्रोमोमध्ये करणने 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीला उपस्थित न राहिल्याबद्दल करीनाला फटकारले आहे. अमिषा पटेलसोबत काही समस्या आणि इतिहास असल्याचेही तो म्हणतो.

त्यानंतर करीनाने विचारले की, अमिषा पटेलसोबतचा तिचा इतिहास काय आहे? तर करण जोहर सांगतो की करीना 'कहो ना प्यार है' करणार होती, पण नंतर अमिषाने ते केले.

हे ऐकून करीना आपला चेहरा दुसरीकडे वळवते आणि म्हणते, 'मी करणकडे दुर्लक्ष करत आहे, जसे तुम्ही सर्व पाहू शकता.

अमिषा अन् करिनामध्ये कोणता वाद होता?

वास्तविक, 'कहो ना प्यार'च्या वेळेपासून करीना आणि अमिषा पटेल यांच्यात तणाव होता. यापूर्वी करिनाला या चित्रपटात साईन करण्यात आले होते. तिने काही भाग शूटही केले होते.

पण नंतर काही कारणास्तव त्याने हा चित्रपट सोडला, त्यानंतर अमिषा पटेलने 'कहो ना प्यार है'मधून डेब्यू केला. या चित्रपटात अमीषाची हृतिक रोशनसोबतची जोडी खूप आवडली होती. या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही केले.

दरम्यान, करण जौहरचा शो नेहमीच चर्चेचा विषय असतो. इथे येमारे कलाकार प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात वाहवा तरी मिळवतात किंवा त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला तरी सामोरे जावे लागते.

यावर्षी रणवीर-दीपिकाला कॉफी विथ करण मध्ये केलेल्या त्यांच्या नात्यांविषयी वक्तव्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT