Koffee With Karan 7 Dainik Gomantak
मनोरंजन

Koffee With Karan 7: पत्नीची थट्टा केली तर, अक्षय कुमार म्हणाला, मी त्याचे अंतिम संस्कार.....

प्रोमो खूप मजेदार आहे आणि चाहते हा एपिसोड पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत

दैनिक गोमन्तक

अक्षय कुमार आणि समंथा रुथ प्रभू 'कॉफ़ी विथ करण सिझन 7'च्या तिसऱ्या भागात दिसणार आहेत आणि या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे.

अक्षय कुमार आणि समंथा रुथ प्रभू करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सिझन 7' या शोच्या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. या शोचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये तुम्हाला दिसेल की अक्षय कुमार समंथाला उचलून घेऊन येतो.

करण अक्षय ला सांगतो की, तुम्हाला माहीत आहे की तुम्ही टॉप फीमेल सुपरस्टार नंबर 1 ला तुमच्या खांद्यावर घेऊन आला आहात. यानंतर समंथा हसते आणि म्हणते की, मला याबद्दल कोणतीही तक्रार नाही. तेव्हा करण म्हणतो की मलाही माझ्या आयुष्यात एक अक्षय कुमार हवा आहे, तेव्हा अक्षयने उत्तर दिले की तुला उचलायला ५ अक्षय कुमार लागतील हवे आहेत.

मग करण जोहरचे प्रश्न सुरू होतात आणि तो समंथाला लग्नाबद्दल प्रश्न विचारत असतो तेव्हा समंथा त्याला मध्येच थांबवते आणि म्हणते, एक सेकंद, तुला माहित आहे की अनेक दुःखी विवाहांचे कारण तूम्ही आहे.

पत्नी ट्विंकलची खिल्ली उडवणाऱ्यासोबत अक्षय काय करणार?

तेव्हा अक्षय म्हणतो की माझ्यासोबत माझा जोडीदार आहे आणि आता आम्ही दोघेही तुम्हाला मिळून उत्तर देऊ. यानंतर करणने अक्षय कुमारला विचारले की, क्रिस रॉकने टीनाची म्हणजेच ट्विंकल खन्नाची खिल्ली उडवली तर तू काय करशील? यावर अक्षयने लगेच उत्तर दिले की, त्याच्या अंत्यसंस्काराचा खर्च मी देईन. अक्षयचे हे उत्तर ऐकून समंथा आणि करण हसायला लागले.

'कान्स फिल्म फेस्टिवल 2022'मध्ये ख्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवली होती, त्यानंतर विलने स्टेजवर जाऊन ख्रिसला सर्वांसमोर चापट मारली होती, त्यामुळे बराच गदारोळ झाला होता. इतकंच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रोमोमध्ये, करण पुन्हा सामंथाला विचारतो की, तिने तिच्या बेस्ट फ्रेंडची बॅचलर पार्टी आयोजित केल्यास ती कोणत्या 2 बॉलिवूड हंकला आमंत्रित करेल. यावर सामंथा म्हणते, 'रणवीर सिंग आणि रणवीर सिंग.'

यानंतर प्रोमोच्या शेवटी समंथा आणि अक्षय वेगवेगळ्या पद्धतीने डान्स करताना दिसत आहेत, हे पाहून करणलाही हसू आवरता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT