'द ओमिक्रॉन व्हेरिएंट'चे पोस्टर बेकी चीटल या आयरिश दिग्दर्शीकेने बनवले आहे. Twitter/ @BeckyCheatle
मनोरंजन

जाणून घ्या 'Omicron Variant' या व्हायरल चित्रपटाच्या पोस्टरचे सत्य

त्याच्या हातात एक मुंगीही दिसत आहे. या पोस्टरची टॅगलाइन 'ज्या दिवशी पृथ्वी स्मशानात बदलेल' अशी आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: कोरोना व्हायरस (Covid 19) ने दोन वर्षांपासून जगभरात दहशत निर्माण केली असून आता त्याचे नवीन प्रकार लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे आहे. अलीकडेच, भारतातही कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची पहिली दोन प्रकरणे आढळून आली आहेत. ओमिक्रॉन संकटाचे (Covid 19 Omicron variant) देशात आगमन होताच, 'Omicron variant' नावाच्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पोस्टर पाहून असे दिसते की जणू काही वर्षांपूर्वी ओमिक्रॉन व्हेरीएंटचा अंदाज आला होता.

हॉरर थीम असलेल्या पोस्टरमध्ये एक मुलगा आणि मुलगी तारांकित आकाशाकडे भीतीने पाहत असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी त्याच्या मागे रक्ताने माखलेला एक मोठा हात दिसत आहे. त्याच्या हातात एक मुंगीही दिसत आहे. या पोस्टरची टॅगलाइन 'ज्या दिवशी पृथ्वी स्मशानात बदलेल' अशी आहे.

हे पोस्टर व्हायरल होताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नेटिझन्सचे म्हणणे आहे की ओमिक्रॉन व्हेरियंटचा अंदाज फार पूर्वीच आला होता. सोशल मीडियावर हे पोस्टर सतत रिट्विट केले जात आहे, ज्यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

वास्तविक, हे पोस्टर आयरिश दिग्दर्शीका बेकी चीटलने (Becky Cheatle) बनवले आहे. हे पोस्टर त्यांनी गंमतीने बनवले आहे. 1974 साली आलेल्या स्पैनिश फिल्म सुसेस एन ला कुआर्टा फासे फेज IV चे पोस्टर संपादित करून त्यांनी 'द ओमिक्रॉन व्हेरिएंट' चे पोस्टर बनवले, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोस्टर व्हायरल झाल्यानंतर, चीतलने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने स्पष्ट केले की हे पोस्टर एक विनोद आहे, जे तीने मनोरंजनासाठी बनवले आहे. कारण, कोविड 19 चित्रपटाचा नवीन प्रकार त्याला क्लासिक सायन्स फिक्शन चित्रपटासाठी चांगले नाव वाटले होते. हे पोस्टर जरी गमतीने तयार केले असले तरी देशात ओमिक्रॉनने देशात पुन्हा एकदा दहशत निर्णान केली आहे. देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आणि कोविड टेस्टींग सक्तीची करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT