'खतरों के खिलाड़ी 11' चा विजेता अर्जुन बिजलानी व पहीली रनर अप दिव्यांका त्रिपाठी व रोहित शेट्टी  @ColorsTV
मनोरंजन

KKK 11: अर्जुन बिजलानी बनला 'खतरों के खिलाड़ी 11' चा विजेता

दिव्यांका त्रिपाठी झाली पहीली रनर अप

Dainik Gomantak

मनोरंजन: 17 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या खतरों के खिलाडी 11(KKK 11) , रविवारी रात्री (26 सप्टेंबर) संपले. कलर्स टीव्हीचा (Colors TV) साहसी रिअलिटी शो खतरों के खिलाडी सीझन 11 ला विजेता मिळाला आहे. अर्जुन बिजलानीने (Arjun Bijlani) आपल्या प्रतिस्पर्धी दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi 1st Runner up) आणि विशाल आदित्य सिंग (Vishal Aaditya Singh) यांना पराभूत केल्यानंतर खतरों के खिलाडी 11 ट्रॉफी (KKK 11 Trophy) जिंकली. दिव्यांका त्रिपाठी प्रथम उपविजेती ठरली.

अर्जुन बिजलानी विजेता ठरला

स्टंटवर आधारित रिअलिटी शो 'खतरों के खिलाडी' च्या 11 व्या सीझनचा निकाल आल्यानंतर, चाहते थोडे आश्चर्यचकित झाले, कारण निकाल त्यांच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे उलट निघाला आहे. अर्जुन बिजलानीने खतरों के खिलाडी 11 ट्रॉफी जिंकली आणि दिव्यांका त्रिपाठी विजयापासून फक्त एक पाऊल मागे होती.

रोहित शेट्टीने अर्जुनचे कौतुक केले

शोचा होस्ट रोहित शेट्टीनेही अर्जुन बिजलानीचे कौतुक केले होते. तो म्हणाला होता की अर्जुन नेहमी शांतपणे आपले काम पूर्ण करतो, तो जिंकल्यानंतर घाबरत नाही किंवा नाटक करत नाही. तो जातो, टास्क पूर्ण करतो आणि परत आपल्या जागी येतो. प्रत्येक वेळी त्याने उत्तम कामगिरी केली आहे.

अर्जुन बिजलानी 'मिले हम तुम' आणि 'नागिन' सारख्या टीव्ही मालिकांसाठी ओळखला गेला. अर्जुन बिजलानीने 'खतरों के खिलाडी 11' च्या संपूर्ण हंगामात असाधारण कामगिरी केली. शेवटच्या दिवशी अर्जुन बिलजलानीचा सामना दिव्यांका त्रिपाठी आणि विशाल आदित्य सिंग यांच्याशी होता. अर्जुन बिजलानीला विजेता बनण्यासाठी ट्रॉफीसह 20 लाख रुपये आणि कार मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 2027 मध्ये गोव्यात 'आम आदमी'चे सरकार; केजरीवालांना आत्मविश्वास, काँग्रेसवर भाजपला मदत केल्याचा आरोप

Government Advisory on Cough Syrup: '2 वर्षांखालील मुलांना 'कफ सिरप' देऊ नका!' मृत्यूतांडवानंतर आरोग्य मंत्रालयाकडून सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना

Parra Dussehra 2025: वीरश्रीची प्रचिती आणणारा, विधी-परंपरांचा आविष्कार उत्स्फूर्तपणे घडवणारा 'पर्ये गावचा दसरा'

Horoscope: धनलाभ, नोकरी आणि यश! शुक्र-केतू युतीचा 'या' 3 राशींना मोठा फायदा; दिवाळीपूर्वीच चमकेल नशीब

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

SCROLL FOR NEXT