KK Dainik Gomantak
मनोरंजन

KK Last Video: कॉन्सर्ट दरम्यान, केके म्हणाला 'हाय मैं मर जाऊं यहीं पर' व्हायरल होतोय व्हिडिओ

viral Video: केके यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमन्तक

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ 'केके' यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांपासून ते मोठ्या स्टार्सपर्यंत, केकेच्या निधनाच्या बातमीने त्यांना धक्का बसला आहे. केके यांचे कोलकाता येथे निधन झाले, जेथे ते कॉन्सर्टसाठी आले होते. काल म्हणजेच मंगळवारी गुरुदास केके कॉन्सर्ट करण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचले होते. कॉन्सर्ट सुरू असतानाच केके (KK) यांची तब्येत बिघडू लागली होती, असे सांगण्यात येत आहे. कॉन्सर्टमधील केकेचे सर्व व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो सारखा घाम पुसताना दिसत आहे. (KK last video viral on social media)

कॉन्सर्टचा एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केके 'हाय मर जाऊंगा' म्हणतांना दिसत आहे. जरी त्याने ही गोष्ट त्याच्या चाहत्यांच्या प्रेमापोटी सांगितली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की केके त्यांचे स्वतःचे गाणे 'आँखों में तेरी अजब सी अजब सी अदाने है' गातांना दिसत आहे. गातांना केकेने त्याचा माइक चाहत्यांकडे वळवला आणि चाहते त्याच्या गाण्याच्या (Song) ओळी पुन्हा म्हणताना दिसत आहे. हे ऐकून केके खूश होतो आणि 'हाय मैं यहीं मर जाऊं' असे प्रेमाने म्हणतो. केकेचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

केके त्याच्या शेवटच्या क्षणी लाइव्ह कॉन्सर्टमध्येही होते. कोलकाता येथील गुरुदास कॉलेजच्या फेस्टमध्ये परफॉर्म करत असताना गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ ​​केके यांची तब्येत अचानक बिघडू लागली. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, केके कॉन्सर्ट दरम्यान, वारंवार त्याच्या सहकाऱ्यांना त्याच्या तब्येत बिघडल्याबद्दल सांगत होता. जेव्हा जास्त त्रास झाला तेव्हा त्याने निर्मात्यांना स्पॉटलाइट बंद करण्यास सांगितले. रात्री 8:30 च्या सुमारास केके लाइव्ह कॉन्सर्ट संपवून हॉटेलवर परतले. मात्र, येथेही त्यांना आराम मिळाला नाही आणि तो अचानक पडला, त्यानंतर साडेदहाच्या सुमारास त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT