Kiku Sharda  Dainik Gomantak
मनोरंजन

Kiku Sharda : सर्वांना हसवणारा त्याचा चेहरा आज रडवेला झाला... कपिल शर्मा शो फेम किकू शारदाच्या आई- वडिलांचं निधन

द कपिल शर्मा शो च्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणाऱ्या किकू शारदाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं आहे.

Rahul sadolikar

द कपिल शर्मा शो आपल्यापैकी जवळपास सर्वांनी पाहिला असेल. या शोमध्ये आपल्या स्थूल शरीराने प्रेक्षकांना खळखळुन हसवणाऱ्या किकू शारदासाठी 2023 हे वर्ष अत्यंत वाईट ठरले आहे. किकू शारदाला त्याच्या आई- वडिलांना गमवावे लागले आहे.

इतरांना हसवणारा किकू आज रडला

'द कपिल शर्मा शो'मध्ये वेगवेगळ्या पात्रांनी इतरांना हसवणारा किकू शारदा आज स्वतः दुःखी आहे. त्याचे डोळे ओले आहेत. चेहरा उदास आहे. हसूही नाहीसं झालं आहे. 

कारण त्यांच्या आईवडिलांची सावली त्यांच्यापासून दूर गेली आहे. त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे.

किकूने इंस्टाग्रामवर लिहिली पोस्ट

किकू शारदाने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले आहे, 'गेल्या 2 महिन्यांचे दोन्ही अंगे हरवले... माझे आई आणि वडील.'

आईची आठवण करून किकू शारदाने लिहिले, 'आई... आई मला तुझी खूप आठवण येते, तुझ्याशिवाय आयुष्याचा विचारही केला नाही. 

आता माझ्या टीव्ही शोबद्दल मला कोण फीडबॅक देईल, मी कुठे चुकत आहे आणि मी कुठे बरोबर आहे हे कोण सांगेल. माझ्या प्रत्येक यशावर कोण आनंदी असेल आणि माझ्या प्रत्येक अपयशावर कोण दुःखी असेल.

किकूने लिहिले

किकूने पुढे लिहिले की, 'केबीसीचा एपिसोड पाहिल्यानंतर मला कोण कॉल करेल आणि अमिताभ बच्चन यांनी आज काय मजा केली ते सांगेल.

 तुझ्याकडून खूप काही ऐकायचं होतं, खूप काही बोलायचं होतं तुझ्याकडून, खूप काही मागितलं होतं तुझ्याकडून, आता हे सगळं कोणाकडून? ,

Kiku Sharda

वडिलांसाठी किकू लिहितो

तर किकू शारदाने आपल्या वडिलांसाठी लिहिले , 'पापा- मी तुम्हाला नेहमीच आत्मविश्वासपूर्ण, आयुष्याचा पूर्ण आनंद घेताना पाहिले आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी खूप नियोजन केले होते, तुमच्यासाठी कुटुंब सर्वात महत्त्वाचे आहे.

किकू वडिलांसाठी लिहितो

किकूने पुढे लिहिले, 'मी सकारात्मकतेचे वर्णन करू शकत नाही. तुमच्याइतके सकारात्मक मी कोणालाच पाहिले नाही. आयुष्यातील सर्वात कठीण काळातही तुम्ही नेहमीच सकारात्मक बाजूने विचारत करत राहिलात. 

तुमच्याकडून खूप काही शिकलो, आणि तुमच्याकडून खूप काही शिकायचे आहे.
किकूने पुढे लिहिले की, 'तुम्ही दोघांना निघण्याची घाई केली. जरा थांबूया, काही गोष्टी राहिल्या होत्या. तुम्ही एकमेकांना कायमचे एकत्र राहण्याचे वचन दिले होते आणि तुम्ही एकत्र आहात.

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

SCROLL FOR NEXT