Kiara Advani  Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: कियारा अडवाणीने रॅम्प वॉक करतांना सासूला केले फ्लाइंग किस, यूजर्स म्हणाले...

अडवाणीने मंगळवारी रॅम्प वॉक केला ज्यामध्ये तीने गुलाबी ड्रेस घातला होता. ती या ड्रेसमध्ये बार्बीपेक्षा कमी दिसत नव्हती. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Puja Bonkile

Kiara Advani Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. 

कियारा या वर्षी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकली आहे. ती तिची वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. कियाराही तिच्या सासऱ्यांसोबत बराच वेळ घालवते. 

कियाराला तिच्या सासूसोबत अनेकदा दिसली आहे. कियाराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती रॅम्प वॉक करताना तिच्या सासूला फ्लाइंग किस करतांना दिसत आहे. कियारा आणि तिच्या सासूचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

कियारा अडवाणीने मंगळवारी इंडिया कॉउचर वीकमध्ये डिझायनर्स फाल्गुनी आणि शेन पीकॉकसाठी रॅम्प वॉक केला. कियाराने गुलाबी रंगाचा थाई हाय स्लिट लेहेंगा घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कियाराचा रॅम्प वॉकचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

कियाराने रॅमवर वॉक करतांना सिद्धार्थच्या आईला फ्लाइंग किस केले आहे. हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती चालताना बाजूला बसलेल्या तिच्या सासूला फ्लाइंग किस करते. त्यानंतर तिची सासूही तिला फ्लाइंग किस करते. सासू आणि सुनेचे हे बॉन्डिंग चाहत्यांना खूप आवडले आहे. चाहते या व्हिडिओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

  • चाहत्यांनी केला कमेंटचा पाऊस

कियाराचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती शोनंतर सिद्धार्थच्या आईला भेटते आणि दोघेही एकमेकांना मिठी मारतांना दिसत आहे. यूजर्स या व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - परफेक्ट सून. तर दुसऱ्याने लिहिले - कियारा तिच्या सासु-सासऱ्यासह खूप चांगले वागते. त्याचवेळी, काही लोक कियाराला भारतीय बार्बी म्हणत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कियारा अडवाणी लवकरच राम चरणसोबत गेमचेंजर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

Betting websites, apps Blocked: ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यावर सरकारचा मोठा 'प्रहार'; 300 हून अधिक बेकायदेशीर वेबसाइट्स आणि ॲप्स ब्लॉक!

SCROLL FOR NEXT