Khufiya Dainik Gomantak
मनोरंजन

Khufiya Trailer Release: तब्बूच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज; प्रेक्षक म्हणाले हा तर...

दैनिक गोमन्तक

Khufiya Trailer Release: तब्बू पून्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार सज्ज झाली आहे. खुफिया या चित्रपटात ती दिसून येणार आहे. हा स्पाइ थ्रीलर चित्रपट असून तब्बू एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसून येत आहे. ती या चित्रपटात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसून येत आहे. आता खुफियाचा ट्रेलर रिलिज झाला आहे.

प्रेक्षक या ट्रेलरचे भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. आजपर्यंतचा हा सगळ्यात बेस्ट ट्रेलर असल्याचे म्हटले जात आहे.

एस्केप टू नोव्हेअर नावाच्या पुस्तकावर 'खुफिया' आधारित आहे. ट्रेलरची सुरुवात RAW ने होते. गुप्तहेराची भूमिका करणारी तब्बू एका धोकादायक मोहिमेवर आहे. देशाला धोका देणारा देशद्रोही कोण असू शकतो हे शोधण्याचा ती प्रयत्न करत आहे. तब्बूचा संशय अली फजलच्या व्यक्तिरेखेवर येतो, ज्याला ती देशद्रोही मानते. आता नक्की चित्रपटाची कहाणी काय आहे हे चित्रपट रिलिज झाल्यानंतरच समजणार आहे.

तब्बू आणि विशाल भारद्वाज यांची प्रमुख भूमिका असलेला 'खुफिया' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'खुफिया' हा तब्बू आणि विशालचा तिसरा चित्रपट आहे. २००३ मध्ये 'मकबूल' आणि २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हैदर हा चित्रपटात देखील एकत्र दिसले होते. हे दोन्ही चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या मॅकबेथ आणि हॅम्लेट या कथांवर आधारित होते.

खुफिया हा चित्रपट निओ-नॉयर हेरगिरी थ्रिलर अमर भूषण यांच्या 'एस्केप टू नोव्हेअर' या कादंबरीवर आधारित आहे. यात अली फजल, वामिका गब्बी आणि आशिष विद्यार्थी यांच्याही भूमिका आहेत.

यापैकी वामिकाने गेल्या वर्षी प्राइम व्हिडिओ इंडियाच्या 'मॉडर्न लव्ह मुंबई'मध्ये विशालसोबत आणि या वर्षाच्या सुरुवातीला 'फुर्सत' या चित्रपटात ईशान खट्टरसोबत काम केले आहे. 5 ऑक्टोबरला हा थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT