Yash
Yash Dainik Gomantak
मनोरंजन

साऊथ सुपरस्टार यशने 'The Kashmir Files' आणि 'RRR' पाहिला नाही कारण...

दैनिक गोमन्तक

सध्या 'द काश्मीर फाइल्स' आणि 'आरआरआर' हे दोनच चित्रपटांची चर्चा आहे. या चित्रपटांच्या भरघोस कमाईसमोर इतर चित्रपट तग धरू शकलेले नाहीत. या दोन्ही चित्रपटांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र साऊथ सुपरस्टार यशने अजून 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहिलेला नाही. (KGF star Yash did not watch The Kashmir Files and RRR)

यश सध्या त्याच्या KGF Chapter 2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. एका मुलाखतीत यश, RRR आणि The Kashmir Files या चित्रपटाबद्दल बोलला. बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडणारे हे दोन चित्रपट न बघण्यामागील कारण यशने सांगितले. कन्नड सुपरस्टार म्हणाला, "मी अद्याप 'आरआरआर' आणि 'द काश्मीर फाइल्स' पहिला नाही. मला हे दोन्ही चित्रपट बघायचे आहेत, पण मी KGF च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने माझ्याकडे वेळ नाही." पुढे तो हसत म्हणाला, "मी आत्ता फक्त KGF बघतोय."

बॉलिवूड (Bollywood) विरुद्ध प्रादेशिक सिनेमा या वादावर यशने प्रतिक्रिया दिली. यश म्हणतो, "हा वाद आता कालबाह्य झाला आहे. जेव्हा लोक म्हणतात की हा डब केलेला चित्रपट आहे तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. डबिंग ही एक प्रक्रिया आहे, चित्रपटाचे (Movie) शूट संपल्यानंतर आम्ही कन्नडमध्येही डब करतो.

रॉकी भाई म्हणजेच यश काश्मीर फाइल्स आणि RRR ची स्पर्धा करण्यासाठी येत आहे. KGF भाग 1 च्या जबरदस्त यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी यश 14 एप्रिल रोजी KGF चा दुसरा भाग (KGF Chapter 2) घेऊन येणार आहे. यशशिवाय संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज या चित्रपटात दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

SCROLL FOR NEXT