केश्तो मखर्जी Dainik Gomantak
मनोरंजन

Birth Anniversary: दारूड्याची भूमिका साकारून प्रेक्षकांना अभिनयाची नशा चढवणारे 'केश्‍तो'

जेव्हाही चित्रपटातील ड्रंक सीनचा दिग्दर्शकाला प्रश्न पडतो तेव्हा सर्वात आधी समोर येते तो केश्तो मखर्जीचा (Keshto Mukherjee) चेहरा.

दैनिक गोमन्तक

जेव्हाही चित्रपटातील ड्रंक सीनचा दिग्दर्शकाला प्रश्न पडतो तेव्हा सर्वात आधी समोर येते तो केश्तो मुखर्जीचा (Keshto Mukherjee) चेहरा. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दारुड्याची भूमिका साकारली आहे. पण प्रत्यक्ष जीवनात त्यांने दारू अजिबात प्यायली नाही. एवढेच नाही तर त्यांनी वास्तविक जीवनात कधीही दारूला स्पर्श केला नाही. (Keshto Mukherjee is best drunk scene actor)

केश्तो मखर्जी

केश्तोंचा जन्म कलकत्ता येथे झाला. आधी तो पथनाट्यांमध्ये आपली कला दाखवायचे, पण नंतर ते चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मुंबईला आले. चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांनी केश्तोला फिल्म इंडस्ट्रीत आणले आहे. केश्तोने 1952 साली नागरीक बंगाली चित्रपटाने अभिनय विश्वात प्रवेश केला, मात्र दुर्दैवाने ऋत्विक घटक किंवा केश्तो दोघांनाही हा चित्रपट पाहता आला नाही कारण हा चित्रपट दोघांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला होता.

केश्तो मखर्जी

त्यानंतर हृषीकेश मुखर्जीने त्यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करायला लावले. केश्तो अनेक चित्रपटांमध्ये फक्त एका दारुड्याच्या भूमिकेत दिसले.अनेक लहान पण मजेदार पात्रांनी मन जिंकले.

केश्तो मखर्जी

केश्तोने नंतर राज कपूरसोबत तीसरी कसम चित्रपटात काम केले. यानंतर केश्तो अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसले. जरी त्याची स्क्रीन स्पेस कमी होती, पण ते त्याच्या लहान भूमिकेतूनच प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप सोडत असे.

केश्तो मखर्जी

केश्तो मुखर्जीने 'जंजीर', 'आप की कसम' आणि 'शोले' मधील आपल्या पात्राने सर्वांची मने जिंकली. गोलमाल (79) मधील केश्तो आणि उत्पल दत्त यांच्यातील पोलीस स्टेशनचेा सीन हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट विनोदी सीनपैकी एक मानला जातो.

केश्तो मखर्जी

धर्मेंद्र यांनी एकदा केश्टोसाठी एक गाणं समर्पित केले ज्याचे नाव 'केश्तो चाला' होते. केश्तो शेवटच्या वेळी आतंक चित्रपटात दिसले होते. हा बॉलिवूडचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात धर्मेंद्र, विनोद मेहरा, हेमा मालिनी, अमजद खान मुख्य भूमिकेत होते. केशटो मुखर्जी यांचे 1985 मध्ये निधन झाले. चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रत्येकाच्या मनात ते कायम स्मरणात राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT