Rahul Nema KBC Dainik Gomantak
मनोरंजन

Rahul Nema KBC : 360 फ्रॅक्चर असणारा स्पर्धक KBC मध्ये जिंकणार का 1 कोटी?...

KBC चा 15 वा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिझनमध्ये एकाहुन एक स्पर्धक आपला सहभाग नोंदवताना दिसत आहेत.

Rahul sadolikar

कौन बनेगा करोडपतीच्या 15 वा सीजन दिवसेंदिवस रंजक होताना दिसत आहे. सध्या या शोची चर्चा एका स्पर्धकामुळे होत आहे. शारिरीक व्यंगाचा सामना करत हॉटसीटपर्यंत पोहोचलेल्या एका स्पर्धकाची गोष्ट आज पाहुया.

'कौन बनेगा करोडपती 15' मधील स्पर्धक राहुल नेमाच्या धाडसाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. राहुल नेमा एका आजाराने त्रस्त आहेत. या आजारामुळे आतापर्यंत त्यांना 360 फ्रॅक्चर झाले आहेत. पण राहुलने धीर सोडला नाही. आता तो एक कोटी रुपयांचा प्रश्न खेळताना दिसणार आहे.

स्पर्धकाने केले सर्वांनाच भावुक

'कौन बनेगा करोडपती 15' च्या 17 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये असाच एक स्पर्धक हॉटसीटवर बसला होता, ज्याच्या कथेने सर्वांनाच भावूक केले होते. मात्र अमिताभ बच्चनही या धाडसाचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत.

 या स्पर्धकाचं नाव राहुल कुमार नेमा होतं, तो एका आजाराने त्रस्त आहे, ज्यामुळे त्याला आतापर्यंत 360 फ्रॅक्चर झाले आहेत. थोडयाशा जोरानेही हाड तुटते अशी परिस्थिती आहे. पण त्याचा उत्साह कायम आहे आणि त्याने आशा सोडली नाही.

कपिल देव यांच्यानंतर हॉटसीटवर राहुल

KBC 15 चा भाग रोलओव्हर स्पर्धक कपिल देवपासून सुरू होतो. शोमध्ये ते फक्त 12 लाख 50 हजार रुपये जिंकतात. प्रश्नाचे अचूक उत्तर माहित नसल्यामुळे आणि लाइफलाइन शिल्लक नसल्यामुळे त्यांनी गेम सोडला. यानंतर राहुल शर्माने सर्वात वेगवान फिंगर राउंड जिंकून हॉटसीट गाठली.

शारिरीक व्यंग

राहुल कुमारची उंची ३ फुटांपेक्षा कमी आहे. वडिलांनी राहुलला उचलून हॉटसीटवर नेले. गेम सुरू असताना त्याची कहाणी ऐकून सर्वांचे डोळे पाणावले. राहुल नेमा हे भोपाळ येथील मध्य प्रदेश ग्रामीण बँकेच्या शाखेत सहाय्यक बँक व्यवस्थापक आहेत.

राहुलने सांगितली आपली कहानी

पाच हजार रुपये किमतीच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर राहुलने आपली कहाणी सांगितली. राहुल सांगतो की तो Osteogenesis Imperfect नावाच्या अनुवांशिक आजाराने ग्रस्त आहे. हा असा आजार आहे ज्यामध्ये हाडे अगदी सहजपणे फ्रॅक्चर होतात. राहुलची अवस्था अशी आहे की त्याला कोणीतरी चुकीच्या पद्धतीने पकडले किंवा झोपताना तो उलटा झाला तरी हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात.

मला 360 फ्रॅक्चर झाले

राहुल म्हणाले, 'आकडेवारीनुसार, 20,000 लोकांपैकी एका व्यक्तीला आजार होतो. मला 360 फ्रॅक्चर झाले आहेत. अगदी कमी शक्तीमुळे फ्रॅक्चर होऊ शकते. झोपताना फ्रॅक्चर देखील होऊ शकते. जेव्हा हे घडते तेव्हा मला एक्स-रे करून प्लास्टर करावे लागते. आता सवय झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT