Movie on Seema Haider : सीमा हैदर आणि सचिन मीना यांची लव्हस्टोरी लवकरच... चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

प्रेमासाठी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.
Movie on Seema Haider
Movie on Seema HaiderDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची खूप चर्चा झाली. ऑनलाइन गेम 'PUBG' खेळताना ती भारतातील सचिन मीनाच्या प्रेमात पडली. सीमा सीमेपलीकडे होती, पण सचिनवरच्या प्रेमापोटी ती पतीला सोडून नेपाळमार्गे ग्रेटर नोएडाला आली.

सीमासोबत चार मुलेही आली. सीमाची प्रेमकहाणी सर्वांना कळताच एकच गोंधळ उडाला. सीमा आणि सचिनच्या प्रेमाबद्दलची उत्सुकता अजुन कमी झाली नाही.

 आता या लव्हस्टोरीवर एक चित्रपट बनणार आहे, ज्याचे नाव आहे 'कराची टू नोएडा'. आता त्याचे पहिले पोस्टर रिलीज झाले असून दोन दिवसांनंतर 20 ऑगस्टला हे गाणेही रिलीज होणार आहे.

अमित जानीचे प्रॉडक्शन

अमित जानी यांची कंपनी 'जानी फायरफॉक्स फिल्म्स' सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहे. दिग्दर्शन भरत सिंह यांचे आहे. निर्माते अमित जानी असून त्यांनी चित्रपटाची लिहिली आहेत. प्रीती सरोज ही गायिका आहे. सीमाची भूमिका अभिनेत्री फरहीन फालकने साकारली आहे.

थीम साँग लवकरच

चित्रपट निर्माते अमित जानी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे की चित्रपटाचे थीम साँग 20 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे, या चित्रपटाचे नाव आहे - 'चल पडे हैं हम'.रिलीज झालेल्या  पोस्टरबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री बुरखा आणि साडीमध्ये दिसत आहे आणि तिसऱ्या पोस्टरमध्ये तिचा चेहरा कोमेजलेला दिसत आहे.

Movie on Seema Haider
Britney Spears Divorce : या आंतरराष्ट्रीय पॉपस्टारने घेतला तिसऱ्यांदा घटस्फोट..

पबजी-प्रेम अन् भारत

सीमा आणि सचिनची प्रेमकहाणी 'पबजी' गेमपासून सुरू झाली. सचिन PUBG गेम खेळायचा आणि सीमाही. गेम खेळत असताना दोघेही संपर्कात आले. मग संवाद सुरू झाला. सीमा विवाहित असून चार मुले असूनही दोघे तासनतास बोलू लागले. त्यानंतर सीमा नेपाळमार्गे भारतात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com