Katrina Viki Romantic Photos Dainik Gomantak
मनोरंजन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे रोमॅटिक फोटोज पाहिले का?

कतरिना कैफने काही सेल्फी फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत कतरिनाने लिहिले की, 'इंदौर इन इंदौर'.

दैनिक गोमन्तक

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न झाल्यापासून सतत त्यांचे रोमॅटिक फोटोज् शेअर करत असतात. काही काळापूर्वी अभिनेत्रीने विकीसोबत तिच्या पहिल्या लोहरीचे सुंदर फोटो शेअर केले होते. आता अभिनेत्रीने तिचे काही सेल्फी फोटो शेअर केले आहेत. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर (Katrina Viki Romantic Photos) करत कतरिनाने लिहिले की, 'इंदौर इन इंदौर'.

अभिनेत्री (Katrina Kaif) लाल रंगाच्या शर्टच्या ड्रेसमध्ये दिसत आहे, तर तिने नो मेकअप लूकमध्ये तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. कतरिनाच्या सुंदर फोटोंवर कमेंट करताना तिची मैत्रिण नेहा धुपियाने (Neha Dhupia) लिहिले, 'कूल कॅप्शन'.

विकी कौशल (Vicky Kaushal) डिसेंबरपासून इंदूरमध्ये शूटिंग करत आहे. दरम्यान, अभिनेता दोनदा मुंबईला गेला आहे. विकी सध्या सारासोबत त्याचा आगामी चित्रपट 'लुका छुपी 2' चे शूटिंग करत आहे. कतरिना आठवडाभरापूर्वीच इंदूरला पोहोचली होती.

दोघांनी मिळून लोहरी साजरी केली आहे आणि सनाचा आनंद घेत या जोडप्याने आपले काही खास क्षण चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या खास प्रसंगी कॅटने लाल रंगाचा पंजाबी एथनिक पोशाख परिधान केला होता आणि विकी कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता.

लग्नाला एक महिना पूर्ण होत असताना विकी आणि कतरिनाने स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यासोबतच या जोडप्याने त्यांच्या लग्नातील संगीताचे काही न पाहिलेले फोटोही देखील शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT