vicky kaushal katrina baby Dainik Gomantak
मनोरंजन

katrina kaif Pregnant: "ही तर 2 वर्षांपासून गरोदर" विकी-कतरीनाची 'गुड न्यूज' चर्चेत, नोव्हेंबरमध्ये पाळणा हलणार?

Katrina Kaif pregnant news: भिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल गेल्या काही वर्षांपासून एका खास बातमीमुळे सतत चर्चेत आहेत

Akshata Chhatre

katrina kaif pregnancy: बॉलीवूडमधील सेलिब्रिटींच्या आयुष्याबद्दलच्या चर्चा नेहमीच सुरू असतात. पण अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल गेल्या काही वर्षांपासून एका खास बातमीमुळे सतत चर्चेत आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा गरोदरपणाच्या चर्चा ऐकायला मिळतात. आता पुन्हा एकदा या चर्चांना वेग आला आहे, आणि यावेळी या बातम्या खऱ्या असू शकतात, असे काही रिपोर्ट्समधून समोर येत आहे.

'ती अनेक वर्षांपासून गर्भवती आहे!'

२०२१ मध्ये कतरिना आणि विकी कौशल यांनी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हे जोडपे जेव्हा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी दिसायचे, तेव्हा त्यांच्या कपड्यांवरून किंवा चालण्यावरून नेटकरी कतरिना गर्भवती असल्याचा अंदाज बांधत असत.

नुकतेच हे जोडपे एका फेरी पोर्टवर एकत्र दिसले, आणि पुन्हा एकदा त्यांच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कतरिना खरोखरच पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या चर्चांमुळे चाहते गंमतीने याला 'सर्वात लांब गरोदरपण' असे म्हणत आहेत. एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले, "मी फक्त तेव्हाच विश्वास ठेवेन, जेव्हा हे जोडपे स्वतः याची पुष्टी करतील. ती गेली अनेक वर्षांपासून गर्भवती आहे! पण या वेळी हे खरं असो अशी माझी आशा आहे." दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, "हे अगदी खरं आहे, सर्वात लांब गरोदरपण, पण मी त्यांच्यासाठी खूप आनंदी आहे."

चाहत्यांचे तर्क आणि विकीचे आश्वासन

काही चाहत्यांनी कतरिनाच्या बदललेल्या लूकवरही लक्ष वेधले आहे. एका नेटकऱ्याने तिच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत लिहिले की, "तुम्ही तिचा बेबी बंप पाहू शकता आणि तिची बोटेही सुजलेली दिसत आहेत."

आणखी एका चाहत्याने सांगितले की, कतरिना गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमात किंवा विमानतळावर दिसली नाही, तसेच तिने तिच्या स्वतःच्या 'के ब्युटी' ब्रँडच्या यूकेमधील लाँचिंगलाही हजेरी लावली नाही, यावरूनही अंदाज बांधले जात आहेत.

गेल्या वर्षी 'बॅड न्यूज' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकी कौशलला विचारले होते की ते कधी 'गुड न्यूज' देणार. त्यावेळी त्याने योग्य वेळ आल्यावर नक्कीच माहिती देण्याचे आश्वासन दिले होते. आता चाहते फक्त कतरिना आणि विकी या बातमीची अधिकृत पुष्टी करतील, याची वाट पाहत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT