Actor Kartik Aaryan Dainik Gomantak
मनोरंजन

Kartik Aaryan:कार्तिक आर्यनने 'कॉफी विथ करण'ला का केले टार्गेट?

रॅपिड फायर शोमध्ये मी खूप लोकप्रिय आहे याचा मला खूप अभिमान आहे

दैनिक गोमन्तक

Coffee With Karan: कॉफी विथ करण सीझन 7'मध्ये अनेक कलाकारांनी कार्तिक आर्यनला टार्गेट केले आहे. रॅपिड फायर शो दरम्यान आर्यनला टार्गेट केले होते. कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये सारा अली खानने तिचा एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनवरही निशाणा साधला होता. आता कार्तिक आर्यनने यावर खिल्ली उडवली आहे.

कॉफ़ी विथ करण सीझन 7 मधील कलाकारांचे लक्ष्य कार्तिक आर्यनकडे

कार्तिक आर्यन म्हणाला की, रॅपिड फायर शोमध्ये मी खूप लोकप्रिय आहे याचा मला खूप अभिमान आहे.या शोमध्ये कार्तिक आर्यन प्रत्यक्ष्य किंवा अप्रत्यक्षरीत्या त्याला टार्गेट केले जात आहे असे त्याचे म्हणणे आहे. त्याचबरोबर करण जोहर हा शो होस्ट करत आहे.

सारा अली खानने कार्तिक आर्यनवर साधला निशाणा

सारा अली खान आणि जान्हवी कपूर कॉफी विथ करण सीझन सातच्या दुसऱ्या भागात दिसल्या होत्या. साराने तिचा एक्स-बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनवर ताशेरे ओढले. करण जोहरने तिला विचारले, 'तुझा एक्स, एक्स का आहे?' यावर सारा अली खान म्हणाली होती, 'कारण तो सर्वांचा एक्स आहे.' करण जोहरने या एपिसोडवर कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला होता.

याआधी रणवीर सिंगने कार्तिक आर्यनची नक्कल केली होती.आता कार्तिक आर्यनने एका मुलाखतीत 'मी रॅपिड फायर शोमध्ये खूप लोकप्रिय आहे' असे म्हटले आहे. याला कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, 'हा प्रश्न करण जोहरलाही विचारा.तर दुसऱ्याने लिहले की,' 'कॉफी विथ करणमध्ये आलेल्या रणवीर आणि सारा यांच्यावर निशाणा आहे का?

सारा अली खानला कार्तिक आर्यन खूपच आकर्षक वाटतो

कॉफी विथ करणच्या 2018 च्या एपिसोडमध्ये सारा अली खान तिच्या वडिलांसोबत आली होती. त्यानंतर तिने सांगितले की तिला कार्तिक आर्यन खूप आकर्षक वाटतो. यानंतर दोघांनी 'लव्ह आज कल' या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट 2020 मध्ये आला आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत होते, नंतर हे दोघे वेगळे झाले.

अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे कायमच चर्चेत असतो. अभिनेता कार्तिक आर्यन नुकताच 'भूल भुलैया 2' मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्याशिवाय कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मालमतेच्या वादातून जबरी मारहाण, मृतदेह सापडला गंभीर अवस्थेत; 3 कामगारांना अटक, मुख्‍य सूत्रधार बेपत्ता

Saligao Murder: एकाच खोलीत दोघांचे मृतदेह! दुहेरी खुनाच्या घटनेने साळगाव हादरले; संशयित मुंबईकडे फरार झाल्याची शक्यता

Horoscope: गुप्त शत्रूंकडून सावध राहा, कामात संयम ठेवा आणि निर्णय घाईत घेऊ नका; तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

SCROLL FOR NEXT